छत्रपती संभाजीनगर

दुष्यंत पाटील- दिवाळी

CD
(दिवाळी अंकासाठी) --- लीड --- मराठवाड्याच्या आणि विशेषतः छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक इतिहासात सध्याचा काळ हा ‘गोल्डन एरा’ आहे. १९८२-८३ मध्ये ‘बजाज’ आले, ती मोठी क्रांती होती; आता टोयोटा आणि एथरसारखे प्रकल्प येणे, ही त्यापेक्षा दहापट मोठी गोष्ट आहे. औद्योगिक विस्तारासाठी आपल्याला जणू ‘कुबेराचा खजिना’च मिळालाय, पण त्याचे ‘सिव्हिक सेन्स’ने सोने करणे हे केवळ प्रशासनाचेच नाही, तर इथल्या प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे... एनके ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक तसेच सीएमआयएचे माजी अध्यक्ष दुष्यंत पाटील यांनी मांडलेले विचार... --- औद्योगिक विस्ताराची ‘गोल्डन’ संधी -- मी उद्योजकतेच्या तिसऱ्या पिढीतला प्रतिनिधी. माझे आजोबा ड्रॉइंग टीचर होते, त्यांनी १९७२ मध्ये सुरू केलेला व्यवसाय वडील आणि काकांनी समर्थपणे पुढे नेला. आज आम्ही भाऊ मिळून तीन प्लांट सांभाळत असून पेपर इंडस्ट्रीत एक विश्वासार्ह ब्रँड निर्माण केला आहे. माझे वडील नरेंद्र पाटील हे १५ वर्षे नगरसेवक होते. मला राजकारणात रस नसला, तरी समाजकारणाचा वारसा रक्तामध्येच आहे. त्यातूनच उद्योग आणि सामाजिक कामे यांची सांगड घालण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो. मराठवाड्याच्या आणि विशेषतः छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक इतिहासात सध्याचा काळ हा ‘गोल्डन एरा’ आहे. १९८२-८३ मध्ये ‘बजाज’ आले, ती मोठी क्रांती होती; आता टोयोटा आणि एथरसारखे प्रकल्प येणे, ही त्यापेक्षा दहापट मोठी गोष्ट आहे. औद्योगिक विस्तारासाठी आपल्याला जणू ‘कुबेराचा खजिना’च मिळालाय, पण त्याचे ‘सिव्हिक सेन्स’ने सोने करणे हे केवळ प्रशासनाचेच नाही, तर इथल्या प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. टोयोटाला दिले प्रगतीचे ‘डॉक्युमेंटेशन’ -- टोयोटासारखा जागतिक ब्रँड शहरात आणण्यासाठी पडद्यामागे घडलेल्या घडामोडींचा मागोवा घेतला तर टोयोटा जागा शोधतेय हे कळल्यावर नितीन गुप्ता, उत्सव माच्छर, अथर्वेशराज नंदावत आणि अर्पित सावे यांच्यासह आम्ही ५-६ जणांच्या टीमने जिद्दीने प्रयत्न सुरू केले. टोयोटाचे पार्टनर किर्लोस्कर ग्रुपच्या गीतांजली किर्लोस्कर यांचे बालपण इथेच गेले असल्याने आम्हाला एक भावनिक दुवा मिळाला होता. जपानी लोक अत्यंत चोखंदळ असतात. त्यांना तत्कालीन औरंगाबादची प्रतिमा इतकी प्रभावीपणे दाखवली, की त्यांना आम्हाला नाकारताच आले नाही. त्यांच्या तब्बल १४ व्हिजिट झाल्या. आम्ही त्यांच्यासाठी बुके किंवा मोमेंटो देण्याऐवजी मराठवाड्याच्या प्रगतीचे ‘डॉक्युमेंटेशन’ सादर केले. जपानी प्रतिनिधींनी आम्हाला विचारले, की राजकीय उलथापालथीबद्दल तुमचे काय मत आहे? आम्ही सांगितले, हे तर चांगले आहे, कारण आता विकास करणे राजकारण्यांची गरज झाली आहे. त्यांनी एमआयएमच्या खासदाराबद्दल विचारले, तेव्हा आम्ही सांगितले, की ते सुशिक्षित आहेत आणि मातृभाषेत शपथ घेणारे आहेत. नैसर्गिक आपत्तीच्या धोक्याबद्दल आम्ही पटवून देत होतो, तेव्हा त्यांनी लातूरच्या भूकंपाबद्दल विचारले. आम्ही मात्र त्यांना ३० वर्षांत या ठिकाणी कोणतीही नैसर्गिक आपत्ती आली नसल्याचे पटवून दिले. विमान कनेक्टिव्हिटीबद्दल विचारल्यावर आम्ही त्यांना ‘शिर्डी एअरपोर्ट’चा पर्याय दीड तासाच्या अंतरावर असल्याचे दाखवून दिले. त्यांनी ते स्वतः टेस्ट केले आणि त्यांचा तेव्हा विश्वास बसला! दूरदृष्टी आणि प्लॅनिंग -- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दूरदृष्टी, गुंतवणूक आणि धोरणनिर्मितीतील मुख्यमंत्र्यांचे सल्लागार कौस्तुभ धवसे यांच्या नियोजनामुळे या सर्व गुंतवणुकी शक्य झाल्या आहेत आणि पुढेही होतील. या सर्व प्रक्रियेत माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड आणि ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांची मोठी मदत झाली. शिवाय विभागीय आयुक्त म्हणून जी. श्रीकांत यांच्यासारखे तरुण आणि विकासाचे ध्येय जोमाने पुढे नेणारे अधिकारी यांचाही यात मोठा वाटा आहे. शहरासाठी श्रमदान केले तर... --- टोयोटा आणि एथरच्या प्रकल्पामुळे येत्या पाच वर्षांत शहराची ग्रोथ १०-१२ टक्क्यांनी वाढणार आहे. छत्रपती संभाजीनगर शहराच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात अर्ध्या तासात पोचता येते, ही आपली खासियत आहे. पण जर आपला ‘सिव्हिक सेन्स’ सुधारला नाही, तर हे चित्र खराब होईल. लोक बाहेर गेल्यावर शिस्त पाळतात, विमानात कचरा टाकत नाहीत, मग शहरात का कुठेही थुंकतात? हा मानसिक अडथळा दूर व्हायला हवा. आपण प्रत्येकाने जर आठवड्यातून फक्त दोन तास शहरासाठी श्रमदान केले, तरी मोठे परिवर्तन घडू शकते. वैयक्तिक सामाजिक जबाबदारी (पीएसआर-पर्सनल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) ही संकल्पना आपण रुजवायला हवी. आयटी पार्क आणि उद्योजकता -- छत्रपती संभाजीनगर शहरात आयटी रेव्होल्युशन येण्यासाठी सीएमआयए सातत्याने प्रयत्नशील आहे. ‘आम्ही सरकारकडे केवळ एका डेडिकेटेड एरियाची मागणी केली आहे, जिथे हायस्पीड इंटरनेट, नो-हॉकर्स झोन आणि अखंड चांगल्या दर्जाची वीज असेल. १५-२० आयटी कंपन्यांनी आधीच स्वारस्य दाखवले आहे. आपल्याकडे टॅलेंट पूल मोठा आहे; जर आपण त्यांना इथेच संधी दिली, तर त्यांची कार्यक्षमता वाढेल कारण ते आपल्या कुटुंबासोबत राहतील. प्रशासकीय ब्लंडर्स आणि उपाय -- शहरातील नियोजनावर योग्य काम व्हायला हवे. एकाच रस्त्यासाठी तीनवेळा खोदकाम होणे, फ्लायओव्हरची उंची कमी झाल्यामुळे खाली बोगदा करावा लागणे किंवा पाइपलाइन टाकल्यावर रस्ता रुंदीकरणाचा विचार करणे, हे ‘प्लॅनिंग ब्लंडर्स’ आहेत. यामुळे जनतेचा पैसा वाया जातो. रस्ते छोटे ठेवण्याचे धोरण चुकीचे आहे. बिडकीन प्रकल्पाच्या एका शिफ्टच्या २५ बस एकाच वेळी पैठण रोडवर आल्या, तर काय परिस्थिती होईल, याचा विचार आताच व्हायला हवा. यासाठी माध्यमांनीही ‘प्रेशर ग्रुप’ म्हणून काम करणे गरजेचे आहे. ‘भूमिपुत्रांनो, ‘माहेरी’ परत या! -- बाहेर शिकायला गेलेल्या भूमिपुत्रांनी आता माहेरी (शहरात) परत यावे, कारण इथे संधींचा समुद्र आहे. शहरात मोठ्या प्रकल्पांची प्रत्यक्ष गुंतवणूक, त्यांच्या व्हेंडरची गुंतवणूक आणि पुरवठा साखळी यातून खूप मोठे जाळे इथे विणले जाणार आहे. अशी संधी असताना इथला प्रत्येक दुकानदार आणि नागरिकाने आपले शहर आपले घर मानले, तर छत्रपती संभाजीनगर हे देशासाठी एक ‘रेफरन्स पॉइट’ ठरेल. आज देशात राजकीय अलाइनमेंट महापौरांपासून पंतप्रधानांपर्यंत एकच आहे, ही संधी पुन्हा मिळणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bachchu Kadu : दिवाळी मदतीवरून बच्चू कडूंचा महायुती सरकारला घरचा आहेर, शेतकर्‍यांना 10 हजारांची मदत देण्याची मागणी

INDA vs NZA, Test: कठीण प्रसंगी जुरेल चमकला! ठोकले दमदार शतक, आकाश दीपचीही फिफ्टी; पण न्यूझीलंडच्या बॉयलकडून चोख प्रत्युत्तर

Paragao farmers: एक एकरात १३५ टन उसाचे उत्पादन; पारगावच्या शिक्षक दांपत्याची शेतीत कमाल

Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा रक्तरंजित संघर्ष! दोन गटांत भीषण गोळीबार; पाच जणांचा मृत्यू, तणाव वाढणार?

IND vs NZ: ईशान किशनने सूर्यकुमारला टाकलं मागे अन् असा पराक्रम करणारा बनला पहिलाच भारतीय

SCROLL FOR NEXT