छत्रपती संभाजीनगर

जिल्हा परिषदेत निधीवरून महायुतीतच धुसफूस!

CD
जिल्हा परिषदेत निधीवरून महायुतीतच धुसफूस! ----- समान वाटप करण्याची शिवसेना सदस्यांची मागणी ----- धाराशिव, ता. ३१ (बातमीदार) : जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता असतानाही घटक पक्षांतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीच्या वाटपावरून सत्ताधारी महायुतीतील शिवसेनेच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. निधीचे समान वाटप करण्याची मागणी त्यांनी केली आहे. पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतील दहा टक्के रक्कम प्राथमिक शाळांतील स्वच्छतागृहे आणि काही गावांमध्ये अभ्यासिका उभारण्यासाठी खर्च करण्याचा ठराव आहे. मात्र, हा निधी सर्व सदस्यांना समान वाटावा, अशी मागणी आमदार प्रा. तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली निवडून आलेल्या शिवसेनेच्या दहा सदस्यांनी जूनमध्येच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली होती. दुसरीकडे, शिवसेनेच्या (यूबीटी) सदस्यांनीही निधीचा वापर गरजेनुसार करण्याची मागणी केली आहे. दुष्काळ व पाणीटंचाई निवारणासाठी शिल्लक निधी वापरण्याची विनंती त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. दरम्यान, आमदार सावंत यांनी सहा महिन्यांत जिल्हा परिषदेत सत्तांतर घडविण्याचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे आगामी सर्वसाधारण सभेत निधीच्या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधकांची भूमिका काय राहणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हनी सिंगच्या पुतण्यासह दोघांचा भीषण अपघातात मृत्यू, भरधाव कारची ट्रॅक्टर-ट्रॉलीला मागून धडक; बर्थडे पार्टीहून परतताना दुर्घटना

Tarapur MIDC Fire: तारापूर एमआयडीसीतील गिनी सिल्क मिलला भीषण आग; अडीच तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण, जीवितहानी टळली

Vastu Tips: घराच्या मुख्य दरवाजावर कोणते 'तोरण' लावणे ठरते अत्यंत शुभ?वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य नियम!

CM Devendra Fadnavis: चीनचे काँग्रेसला फंडिंग का? अराजक माजवणाऱ्यांना रस्त्यावर उतरून उत्तर देऊ, फडणवीसांचा हल्लाबोल

'स्वामींच्या रुपाने मला आई भेटली…' अक्कलकोटमधील तो अनुभव सांगताना निवेदिता सराफ यांना अश्रू अनावर! म्हणाल्या, 'डोकं ठेवलं तेव्हा…'

SCROLL FOR NEXT