Aurangabad Crime esakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादमधील तोंडोळी गाव पुन्हा हादरले;सहा ठिकाणी चोरी,तरुणांनी चोराला पकडले

साडेतीन महिन्यांपूर्वी राज्यभर खळबळ उडवून दिलेल्या दरोडा व अत्याचार घटनेनंतर पुन्हा तोंडोळी गावात दोन रात्रीत सहा ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत.

ज्ञानेश्‍वर बोरुडे

लोहगाव (जि.औरंगाबाद) : साडेतीन महिन्यांपूर्वी राज्यभर खळबळ उडवून दिलेल्या दरोडा व अत्याचार घटनेनंतर पुन्हा तोंडोळी (ता.पैठण) गावात दोन रात्रीत सहा ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत. एका ठिकाणी चोरी करताना शेजारील तरूणांनी एका चोराला हत्यारासह पकडून गावकऱ्यांच्या मदतीने बिडकीन (Bidkin) पोलिसाच्या हवाली केले आहे. तोंडोळी येथे ऑक्टोबरमध्ये एका शेतवस्तीवर मामा-भांजे चोराच्या गँगने रात्री दरोडा टाकून महिलावर अत्याचार केल्याच्या घटनेने राज्यभर खळबळ उडाली असताना बिडकीन पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेचे (Aurangabad Crime) पाच पथकाने मामा भांजे गँगला पकडून जेरबंद केले होते. साडेतीन महिन्यानंतर पुन्हा एकदा चोरांनी या गावाला लक्ष केल्याची घटना गुरूवार (ता.२८) व शुक्रवार (ता.२९) मध्यरात्री घडल्या. यात अज्ञात चोरट्यांनी रावसाहेब कदम यांची सोन्याची पोत, नगदी रक्कम तर राम गरड यांचे सोन्याचे ओम, नगदी रक्कम, नामदेव गरड यांच्या घरी व दत्तात्रय गरड यांचा बोकड्याची चोरी केली तर भारत गरड याच्या घरामागील दरवाजा उघडण्याच्या प्रयत्न चोरटे करत असताना घरातील लोक जागे झाल्याने चोर पळवून गेले होते. (Tondoli Village Of Aurangabad Again In News, Six Theft Incident Happened)

दुसऱ्या दिवशी रात्री दादासाहेब मस्के यांचा कडीकोंडा तोडून कपाटातील कपडे लत्ता साहित्याची अस्ताव्यस्त करून कानातील सोन्याची रिंग, नाकातील नथ व नगदी दहा हजार रूपयाची चोरी करून या चोरट्यांनी अकील अब्दुल वकील शेख यांच्या घरातील चोरी करताना झालेल्या आवाजाने शेजारचे तरुण जागे झाले असता त्यांनी मोठ्या शिताफीने एका चोरट्याला टाँबी, पकड, दोन घड्याळ रोख रक्कम, सोने मनीसह पकडून गावकऱ्यांच्या मदतीने बिडकीन पोलिसांना बोलावून आरोपी चोर गोरख ड्रायव्हर चव्हाण (रा.बाबरगाव, ता.गंगापूर) याला पोलीसाच्या हवाली केले.

इतर चोर पळून गेले होते. दरम्यान या प्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात अकील शेख व दादासाहेब मस्के यांच्या तक्रारी वरून चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला असुन पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संतोष माने,फौजदार छोटूसिंग गिराशे, हवालदार शिवानंद बनगे, योगेश नाडे, रविंद्र पवार करित आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT