‘टू इज कंपनी’ नाटकाची ‘भक्ती बर्वे करंडक’ स्पर्धेच्या अंतिम फेरीत निवड
--
सकाळ वृत्तसेवा
लातूर, ता. ६ : पुणे येथील स्पेशल फोर्टी फेसबुक ग्रुप व ऑल इंडिया सिनेवर्कर्स असोसिशनच्या वतीने आयोजित भक्ती बर्वे इनामदार करंडक स्पर्धेत लातूरचा माजी विद्यार्थी संघ, जयक्रांती अध्यापक महाविद्यालयाच्या संघाच्या ‘टू इज कंपनी’ या नाटकाची अंतिम फेरीत निवड झाली आहे. ही स्पर्धा पुण्यात रंगणार आहे.
सबंध महाराष्ट्रातून ३३ संघ सहभागी झालेल्या या स्पर्धेची प्राथमिक फेरी रेकॉर्डिंग स्तरावर पार पडली. यात अंतिम फेरीसाठी नऊ संघांची निवड झाली. यात मनोज कोल्हटकर यांनी लिहिलेल्या व ॲड. शैलेश गोजमगुंडे यांनी दिग्दर्शन केलेल्या ‘टू इज कंपनी’चा समावेश असून नाटकामध्ये राजीव गड्डीमे, ॲड. हंसराज (सुनील) साळुंके व बालाजी कांबळे या अभिनेत्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. तर प्रकाश योजना गुणवंत (सुरेश) सूर्यवंशी, संगीत संयोजन अक्षय बाहेती, नेपथ्य ॲड. बालाजी म्हेत्रे तर रंगभूषा सचिन उपाध्ये यांनी केले आहे.
‘जस्ट फॉर फन’र, ‘उंच माझा झोका गं!’र, ‘मुक्ती’, ‘उन्हातलं चांदणं’ या नाटकांनंतर आता टू इज कंपनी या नाटकाने लातूरच्या नाट्यविश्वाला सन्मान मिळवून दिला आहे. आता प्रतीक्षा अंतिम फेरीची आहे. या नाटकासाठी निर्मिती साहाय्य प्रा. प्रशांत घार, योगीराज पुणेकर यांचे आहे तर सुधीर गोजमगुंडे, अजय गोजमगुंडे, कामगार कल्याण विभागाचे सलीम पठाण यांचे विशेष साहाय्य लाभले आहे. या यशाबद्दल ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. गिरीश सहदेव, प्रा. दीपक वेदपाठक, डॉ. अशोक आरदवाड, बालरंगभूमी परिषदेचे अध्यक्ष रणजित आचार्य, समीक्षक अनिल पुरी, बंडू एचवाड, लक्ष्मण वासमोडे, आविष्कार गोजमगुंडे, दस्तगीर शेख, नीलेश सराफ, बाळकृष्ण धायगुडे, अनिल कांबळे, सुमती बिडवे, शंकर चामे, नामदेव मुसने, भारत थोरात, प्रमोद कांबळे, संजय जमदाडे यांनी नाटकातील कलाकारांचे अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.