Toyota Kirloskar sakal
छत्रपती संभाजीनगर

Toyota Kirloskar : टोयोटा किर्लोस्करला ८२७ एकर जागा; हायब्रिड, इलेक्ट्रिक कार निर्मिती प्रकल्‍प

Industrial Development : टोयोटा किर्लोस्कर प्रकल्पासाठी बिडकीनमध्ये ८२७ एकर जागा उपलब्ध झाली आहे. या प्रकल्पातून २०२६ मध्ये हायब्रिड व इलेक्ट्रिक कारांचे उत्पादन सुरू होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक जगताचा चेहरामोहरा बदलण्याची क्षमता असलेल्या टोयोटा किर्लोस्कर प्रकल्पासाठी सोमवारी (ता. सात) ऑरिक सिटीमध्ये एकूण ८२७ एकर जागा देण्यात आली. २१ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पात कंपनी हायब्रिड आणि इलेक्ट्रिक कारची निर्मिती करणार आहे.

टोयोटा किर्लोस्कर प्रकल्पाच्या सामंजस्य करारावर नुकत्याच स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर या ग्रीनफिल्ड प्रकल्पाच्या पुढील हालचालींवर सर्वांचे लक्ष होते. या कंपनीला ऑरिक सिटीमध्ये एकूण ८२७ एकर जागा प्राप्त झाली.

सोमवारी ही प्रक्रिया पूर्ण झाली. डीएमआयसीच्या सूत्रांनी सांगितले, की शेंद्रा आणि बिडकीन हे औद्योगिक विभाग विकसित करण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र औद्योगिक नागरे मर्यादित अर्थात एमआयटीएल स्थापन केली आहे. तिच्यामार्फत ही प्रक्रिया केली जात आहे. ऑरिक सिटीच्या बिडकीन विभागात टोयोटा किर्लोस्करचा प्रकल्प उभारला जाणार आहे.

आणखी तीन प्रकल्पांना ऑफर

एकीकडे टोयोटा किर्लोस्कर कंपनीला बिडकीन ऑरिक सिटीत ८२७ एकर जागा दिली गेली, तर दुसरीकडे आणखी तीन प्रकल्पांना जागा देऊ करणारे ऑफर लेटर ‘एमआयटीएल’च्या वतीने सोमवारी देण्यात आले. त्यात एंड्युरन्सच्या ग्रीनफिल्ड प्रकल्पासाठी ३० एकर, तर व्हेरॉकच्या प्रकल्पासाठी १८ एकर जागा देऊ करण्यात अली आहे. ती बिडकीनमध्ये असेल. याशिवाय सिमेन्स कंपनीला शेंद्रा येथे सहा एकर जागा देऊ करण्याचे ऑफर लेटर देण्यात आले.

ऑटोमोबाइल क्षेत्राला चालना

छत्रपती संभाजीनगर हे ऑटोमोबाइल हब म्हणून ओळखले जाते. बजाज, स्कोडा या जुन्या प्रकल्पांनंतर येथे एथेरचा इलेक्ट्रिक दुचाकींचा प्रकल्प आला. आता टोयोटा किर्लोस्कर येत आहे. यामुळे आता ऑटोमोबाइल क्षेत्राशी संबंधित पूरक उद्योगांच्याहीं संधी वाढणार आहेत.

२०२६ मध्ये प्रत्यक्ष उत्पादन

या प्रकल्पासाठी कंपनी २१ हजार कोटी रुपये गुंतवत आहे. प्रकल्पाद्वारे दरवर्षी किमान ४ लाख हायब्रिड आणि इलेक्ट्रिक वाहने तयार करण्याची क्षमता राहणार आहे. जानेवारी २०२६ मध्ये या प्रकल्पातून प्रत्यक्ष उत्पादन सुरू होईल. या मोठ्या प्रकल्पामुळे ८ हजार प्रत्यक्ष आणि १८ हजार अप्रत्यक्ष, अशा एकूण २६ हजार रोजगारांची निर्मिती होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT