छत्रपती संभाजीनगर

ट्रॅक्टरच्या धडकेत मृत्यू; वारसांना ३० लाखांची भरपाई

CD
ट्रॅक्टरच्या धडकेत मृत्यू; वारसांना ३० लाखांची भरपाई ------------- छत्रपती संभाजीनगर, ता. २५ : ट्रॅक्टरच्या धडकेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या वारसांना सहा टक्के व्याजासह ३० लाख १३ हजार ८०० रुपये नुकसान भरपाई द्यावी, असे आदेश मोटार अपघात न्यायाधिकरणाने ट्रॅक्टर चालक- मालक आणि विमा कंपनी यांना दिले. १४ जुलै २०२४ रोजी धुळे-सोलापूर मार्गावरील विठ्ठलपूर शिवारात अपघात झाला होता. कन्नड तालुक्यातील भांबरवाडी येथून राहुल ज्ञानेश्वर सोनवणे आणि कुंदन तलवाडे दुचाकीवरून आई-वडिलांना भेटण्यासाठी जात असताना विठ्ठलपूर शिवारात चुकीच्या दिशेने आलेल्या ट्रॅक्टरने त्यांना उडविले होते. त्यात राहुल सोनवणे यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रॅक्टर चालक शांताराम देशमुख यांच्याविरोधात कन्नड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. राहुल सोनवणे यांची पत्नी, मुले, मुली आणि आई वडिलांनी मोटार अपघात न्यायाधिकरणात नुकसान भरपाईसाठी दावा दाखल केला. न्यायाधिकरणाचे सदस्य सुधाकर सोनवणे यांच्या समोर सोनवणे कुटुंबाच्या वतीने ॲड. देविदास हराळ यांनी बाजू मांडली. त्यांना ॲड. संकेत चव्हाण, ॲड. प्रदीप कापकर, ॲड. टी.बी. दुधे यांनी सहकार्य केले. प्रतिवादींच्या वतीने ॲड. आर.एन. सुसलादे आणि ॲड. के.ए. बनकर यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायाधिकरणाने अपघातात मृत्यू झालेल्या राहुल सोनवणे यांच्या पत्नी, मुले व आई-वडील यांना ३० लाख १३ हजार ८०० रुपये नुकसान भरपाई ६ टक्के व्याजासह देण्याचे आदेश ट्रॅक्टर चालक-मालक आणि विमा कंपनी यांना दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dilip Walse Patil: कर्जतमधील वृक्षतोडीचा भीमाशंकर अभयारण्याशी संबंध नाही; दिलीप वळसे पाटलांचे स्पष्टीकरण

Solapur Crime: मेहुणीला शिक्षणासाठी घरी आणलं, पत्नी असताना तिच्यासोबत लग्न केलं अन्...; सासऱ्याने घडवला रक्तरंजित थरार

VIDEO : मल्लिकार्जुन खरगेंचं वादग्रस्त वक्तव्य; PM मोदींबद्दल बोलताच कार्यक्रमात गोंधळ, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून एकाला मारहाण, नेमकं काय घडलं?

Madhuri Dixit Kon Honaar Karodpati : "बाई, तुम्ही खूप कडक बोलताय..."; शिक्षिकेसमोर थेट विद्यार्थी बनली माधुरी दीक्षित! 'कोण होणार करोडपती'मधील सुंदर क्षणाचा व्हिडिओ व्हायरल!

Latest Marathi News Update : चौकशीपूर्वीच रुग्णालयातून धूम ठोकून राणा सूर्यवंशी पसार! बारामती हल्ला प्रकरणात खळबळ, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT