छत्रपती संभाजीनगर

ट्रॅक्टर खरेदीच्या बहाण्याने सव्वापाच लाखांची फसवणूक

CD
ट्रॅक्टर खरेदीच्या बहाण्याने सव्वापाच लाखांची फसवणूक धाराशिव, ता. १४ ः ट्रॅक्टर विक्रीच्या व्यवहारापोटी अवघे १५०० रुपये फोन पे द्वारे पाठवून आणि खात्यात एकही रुपया नसताना ६ लाखांचा बोगस धनादेश (चेक) देऊन एकाची ५ लाख ३५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी निरंजन नामदेव थोरात (वय २१, रा. जानकापूर, ता. वाशी, जि. धाराशिव) यांच्याकडे ट्रॅक्टर होता. हा ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी आरोपी सोहेल शौकत शेख, विरेन राठोड, समीर अरब (तिघेही रा. अंथुर्गे, ता. इंदापूर, जि. पुणे) आणि बबलू वाघमोडे (रा. शेळगाव, ता. इंदापूर, जि. पुणे) हे १५ एप्रिल २०२६ ला सायंकाळी साडेसात वाजता फिर्यादीच्या घरी आले. आरोपींनी ट्रॅक्टर खरेदीचा व्यवहार ठरवून प्रत्यक्षात व्यवहारापोटी फक्त १५०० रुपये फोन पे द्वारे ट्रान्सफर केले. त्यानंतर उर्वरित रकमेपोटी एचडीएफसी बँकेचा ६ लाख रुपयांचा धनादेश (चेक) फिर्यादीला दिला आणि ट्रॅक्टर घेऊन निघून गेले. मात्र, जेव्हा हा चेक बँकेत जमा केला, तेव्हा आरोपींच्या खात्यात पैसेच नसल्याचे उघडकीस आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी थोरात यांनी आरोपींशी संपर्क साधून विचारणा केली. त्यावेळी आरोपींनी ट्रॅक्टर परस्पर नेऊन फसवणूक तर केलीच, शिवाय ट्रॅक्टर पेटवून देऊ, अशी धमकीही दिली. या प्रकरणी थोरात यांनी मंगळवारी (ता. १३) दिलेल्या फिर्यादीनुसार वाशी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meerut Blue Drum Murder : देशभरात गाजलेल्या 'निळा ड्रम' हत्याकांडाचा निकाल; मुस्कान रस्तोगी आणि प्रियकर साहिल शुक्लाला थेट फाशीची शिक्षा!

पांढऱ्या भिंती, बेड नाही, सोफा नाही; सुशांत सिंह राजपूतच्या घरात अशी राहतेय अदा शर्मा; म्हणते- ज्यांना बसायचंय त्यांनी...

Maharashtra Live News : राहुल गांधी लवकरच महाराष्ट्र दौऱ्यावर; राज्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांची करणार पाहणी

Mohol Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी व चाऱ्यासाठी मोहोळ तालुका त्रासला; खंडाळी ग्रामस्थांचे उपोषण सुरू

ICC T20I Ranking: ईशान किशन-अभिषेक शर्माला टक्कर देणार श्रेयस अय्यर! क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप

SCROLL FOR NEXT