traffic
traffic sakal
छत्रपती संभाजीनगर

अजिंठा घाटात चार तास वाहतूक ठप्प

सकाळ वृत्तसेवा

अजिंठा : अजिंठा घाटात घाटमाथ्यावर चढत असलेली दोन वाहने एकाच वेळी नादुरुस्त झाल्याने बुधवारी (ता.६) पहाटेपासूनच घाटात वाहतुकीची कोंडी झाली. ठप्प झालेली वाहतूक दुपारी १२.३० वाजता सुरळीत झाली. यामुळे महामार्गावर वाहनांच्या दुतर्फा लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

अजिंठा घाट चढत असलेली दोन मालवाहू ट्रक बुधवारी (ता.६) पहाटेपासूनच नादुरुस्त झाली. यामुळे घाटातील वाहतूक ठप्प झाल्याने मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागला. रस्त्यांवरील धुळ व प्रचंड उकाड्याने नागरिक हैरान झाले. यावेळी प्रवाशांनी आपापल्या वाहनातून उतरून झाडांच्या सावलीचा सहारा घेतला.

दरम्यान, माहिती मिळताच अजिंठा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अजित विसपुते, सहकारी अक्रम पठाण, अरुण गाडेकर, विकास चौधरी, प्रकाश कोळी यांनी घटनास्थळी जाऊन वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली.

तोपर्यंत शेकडो वाहनांच्या दुतर्फा लांबच लांब रांगा लागल्या. चार ते पाच तास झालेल्या या वाहतूक कोंडीमुळे वाहनात प्रवास करीत असलेल्या अबाल वृद्धांसह रुग्णांचे हाल झाले. ही वाहतूक सुरळीत करण्यास पोलिसांची चांगलीच दमछाक झाली.

महामार्गावरील अजिंठा घाट ते बाळापूर दरम्यान रस्त्यांच्या कामामुळे या न त्या कारणाने वाहतूक ठप्प होण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने वाहनधारकांची गैरसोय नित्याची झाल्याने घाटातील रस्त्यांचे तसेच बाळापूर नजीकच्या रस्त्यांचे काम त्वरित करावे, अशी मागणी वाहन धारकांमधून होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ponzi Scam: 100 कोटी रुपयांच्या पॉन्झी घोटाळ्याप्रकरणी ईडीचे पुणे, नाशिक अन् कोल्हापुरात छापे! काय आहे प्रकरण?

Canada Accident: कॅनडात भारतीय आजी-आजोबांसह तीन महिन्याच्या नातवाचा अपघातात मृत्यू; दुतावासही हळहळलं

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

SCROLL FOR NEXT