झेब्रा क्रॉसिंगवर वाहधारकांचे अतिक्रमण sakal
छत्रपती संभाजीनगर

Traffic Rules : ‘झेब्रा क्रॉसिंग’वर वाहनधारकांचे अतिक्रमण

चौकाचौकात पोलिसांची बघ्याची भूमिका

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : शहरात रस्त्यांवर नागरिकांना रस्ता ओलांडणे सहज शक्‍य व्हावे म्हणून झेब्रा क्रॉसिंग केलेले आहेत. मात्र झेब्रा क्रॉसिंगवर वाहधारकांचे अतिक्रमण होत असल्याने पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना अक्षरशः जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत आहे.

शहरात महापालिका आणि वाहतूक पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी महापालिकेची आहे; तर त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी शहर वाहतूक विभागाची आहे. शहरात सर्वाधिक वर्दळीचा म्हणून जालना रस्ता ओळखला जातो. यावर चिकलठाण्यापासून ते महावीर चौक (बाबा पेट्रोलपंप) दरम्यान असलेल्या प्रत्येक चौकामध्ये झेब्रा क्रॉसिंग आहेत.

त्यापूर्वी वाहनधारक थांबण्यासाठी स्टॉपलाइनही केलेल्या आहेत. स्टॉपलाइनपूर्वी वाहने थांबली तरच नागरिकांना विनात्रास झेब्रा क्रॉसिंगवरून रस्ता सहज ओलांडता येतो. मात्र पादचाऱ्यांच्या प्रश्‍नांशी वाहतूक पोलिसांना काहीही देणे-घेणे नाही अशी सध्याची परिस्थिती आहे. वाहनधारक स्टॉपलाइन ओलांडून झेब्रा क्रॉसिंगच्याही पुढे जाऊन थांबतात.

परिणामी रस्ता ओलांडणाऱ्या नागरिकांना झेब्रा क्रॉसिंग मिळत नाही. चौकाचौकात वाहतूक नियमन करण्यासाठी थांबलेल्या पोलिसांनी वाहनधारक कटाक्षाने स्टॉपलाइनपूर्वी थांबतील यासाठी सकारात्मक पावले उचलणे अपेक्षित आहे. मात्र, पोलिस कुठलेच प्रयत्न करीत नाहीत. त्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे.

कारवाई अपेक्षित

शहरात अंडरपास नाहीत, काही ठिकाणी ओव्हरब्रिज तयार केले मात्र तेही चुकीच्या पद्धतीने उभारलेले आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी झेब्रा क्रॉसिंग हा आशेचा किरण आहे. मात्र, पोलिस बघ्याची भूमिका घेत असल्याने स्टॉपलाइन आणि झेब्रा क्रॉसिंगचा उपयोग होत नाही. वाहतूक पोलिसांनी प्रत्येक चौकात सिग्नलवर थांबणारी वाहने स्टॉपलाइन ओलांडणार नाहीत, यासाठी कारवाया सुरू केल्या तर वाहनधारकांना स्टॉपलाईनपूर्वी थांबण्याची सवय लागून पादचाऱ्यांना झेब्रा क्रॉसिंग ओलांडण्यास मदत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT