Chhatrapati Sambhajinagar Drowning Incident sakal
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Drowning Incident : खाणीत पोहण्यासाठी गेलेल्या तेरा वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू

Drowning Incident : खाणीत पोहण्यासाठी गेलेल्या तेरा वर्षीय सार्थक कचरू फाटकेचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे फाटके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ वृत्तसेवा

चित्तेपिपंळगाव : खदानीत पोहण्यासाठी गेलेल्या तेरा वर्षीय मुलाचा खदानीतील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवार (ता.२१ रोजी) सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली.

सार्थक कचरू फाटके,वय १३ वर्षं रा गोकुळनगर चित्तेपिंपळगांव ता. छत्रपती संभाजीनगर असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव असून, ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार सार्थक व गावातील त्याचे पाच मित्र हे रोजच्या सवयीप्रमाणे पहाटे पाच वाजता व्यायाम करण्यासाठी जातं असल्याचे सांगून, घराबाहेर पडले , पहाटेचा व्यायाम झाल्यानंतर सार्थक व त्याचे मित्र पांढरी तांड्याच्या बाजूला असलेल्या डोंगरातील एका खदानीच्या पाण्यात सकाळी सात वाजेच्या सुमारास पोहण्यासाठी गेले असता दुर्दैवाने सार्थक याचा ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार पाण्याचा अंदाज किंवा पाण्यातील दगड लागल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला.

सोबतच्या मित्रांनी आरडाओरडा करून आजुबाजुला असलेल्या नागरिकांना बोलावले, स्थानिक नागरिकांनी सार्थक याला पाण्यातून बाहेर काढून तात्काळ छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी त्याला तपासुन मृत्यू घोषित केले , दुपारी तीन वाजता सार्थक याच्यावर गोकुळनगर येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.या घटनेची चिकलठाणा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास चिकलठाणा पोलिस करीत आहेत.

बारा वर्षांपूर्वी वडिलांचे अपघातात निधन..

बारा वर्षापूर्वीची सार्थक हा आईच्या गर्भात असताना , सार्थक याचे वडील कचरू फाटके यांचे अपघातात निधन झाले , सार्थकला त्याच्या सत्तर वर्षांच्या वयोवृद्ध आजोबांनी एकुलत्या एक मुलाच्या अपघातात झालेल्या निधनानंतर सार्थक याचा आजपर्यंत कुटुंबाचा वारस म्हणून पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळ करून त्याला लहानचे मोठे केले ,एक बहिणीच्या पाठीवर एकुलता एक असलेल्या सार्थक याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने फाटके कुटुंबावर दुःखांचा डोंगर कोसळला आहे . काही वर्षांपूर्वी सार्थक याच्या वडिलांचे व आता फाटके कुटुंबाचा वारस असलेला एकुलता एक सार्थकचा दुर्दैवी मृत्यूने गावांत हळहळ व्यक्त होत आहे..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT