photo 
छत्रपती संभाजीनगर

रेल्वे अपघात : शरिराचे तुकडे जुळवाजुळव करताना गहिवरले मन

अनिलकुमार जमधडे

औरंगाबाद, : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने गावाकडे निघालेल्या मजुरांना रेल्वेने चिरडल्याची घटना अंगावर शहारे आणणारी होती. घटनास्थळी अर्धा किलोमीटरच्या परिसरात शरिराचे तुकडे विखुरले होते. रक्त मासांचा सडा पडला होता. 

रेल्वे अपघातस्थळी संपूर्ण परिसरामध्ये मजुरांच्या बॅगांमधील साहित्य, भाकरी, जेवणाचे डबे, पैशाचे पाकीट सर्वत्र विखुरले होते.

एक-एक पार्ट केला गोळा

पोलिसांनी घटनास्थळी ग्राम सुरक्षा दलाच्या मदतीने चिरडलेल्या शरीराच्या अवयवांचा एक-एक पार्ट गोळा केला. हात कुणाचा आहे, तर मुंडके कोणाचे आहे, त्याचा पाय कुठे आहे. याचा ठाव लागणे अवघड होते. कुठेतरी दूरवर कवटी फुटून बाहेर आलेला मेंदू दिसत होता. दूरवर पायाचा पंजा, हाताची बोटे, धड वेगळे झालेले शरीर हे अत्यंत वेदनादायी चित्र होते. मृतदेह झाकण्यासाठी काहीही नसल्याने लिंबाचा पाला, फांद्या वापरण्यात येत होत्या. लिंबाच्या पाल्यामध्ये मृतदेह झाकण्यात आले होते.

त्याला हुंदका फुटत होता.

दुर्घटनेतून वाचलेला एक तरुण ओक्साबोक्शी रडतच हृदयावर दगड ठेवून पोलिसांना माहिती देत होता. माहिती देताना त्याला हुंदका फुटत होता. पोलीस त्याला धीर देत होते. पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील यांनी त्या तरुणाचे अगोदर सांत्वन केले. त्याला धीर दिला आणि हळूहळू बोलते केले. त्यानंतर त्यांनी सर्व कहाणी सांगण्यास सुरवात केली. ही कहाणी हृदयाला पाझर फोडणारी होती. जालना औद्योगीक परिसरातील चंदनझिरा येथे राहणारे हे मजुर तरुण लॉकडाऊनच्या काळात काहीही मिळत नसल्याने हवालदिल झाले होते.

ठेकेदाराने केले हात वर

ठेकेदाराने हात वर केले त्यामुळे पर्याय उरला नाही, त्यामुळेच हो-नाही करत दिवसभर विचार केला, त्यानंतर संध्याकाळी सात वाजता रेल्वे पटरी मार्गाने पायी पायी निघण्याचा निर्णय घेतल्याचे त्या तरुणाने सांगितले.

आम्ही डोळ्यादेखत उद्ध्वस्त झालो

पायी चालून- चालून थकवा आल्यामुळे आम्ही रेल्वे पटरीवर विसावलो सध्या रेल्वे बंद आहेत. हे आम्हाला माहीत होते. त्यामुळे निर्धास्त होतो, थोड्याशा गप्पा मारताना एक एक जण झोपत गेला. केव्हा झोप लागली हे कळलेच नाही. जेव्हा कळाले तेव्हा सर्व संपलेले होते, तोंडातून शब्द फुटत नव्हता. रोज सोबत राहणारे आणि एका ताटात खाणारे आम्ही डोळ्यादेखत उद्ध्वस्त झालो अशी मन खिन्न करणारी कहाणी एकुण पोलिसही गहिवरुन गेले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील ऊस दराच्या स्पर्धाला माळेगावच्या निकालामुळे गालबोट - चंद्रराव तावरे

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

Guru Purnima Remedies 2025: गुरु पौर्णिमेच्या रात्री करा 'हे' उपाय, माता लक्ष्मी प्रसन्न होतील

SCROLL FOR NEXT