ट्रान्सफॉर्मर जळाल्याने दोनशे घरे अंधारात
- -
महावितरणच्या कारभारावर केसरजवळगाकरांचा संताप
- -
केसरजवळगा, ता. २७ (बातमीदार) : येथील तलाठी कार्यालयाजवळील ट्रान्सफॉर्मर जळाल्याने सुमारे दोनशे घरांचा वीजपुरवठा सोमवारी (ता. २६) सायंकाळी पाचपासून तब्बल २१ तासांहून अधिक काळ खंडित राहिला. त्यामुळे नागरिकांना रात्रभर अंधारात काढावी लागली असून, महावितरणच्या दिरंगाईबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
ट्रान्सफॉर्मरवर अधिक भार असल्याने तो वारंवार जळत असल्याची गावकऱ्यांची तक्रार आहे. सोमवारी बिघाड झाल्यानंतर ऑईल उपलब्ध नसणे आणि दुरुस्ती टीम उशिरा मिळणे अशी कारणे पुढे करीत मंगळवारी (ता. २७) दुपारी अडीच वाजता कामास सुरवात झाली. महिनाभरापूर्वी केबल बदलण्याचे काम झाल्यानंतरही पुन्हा ट्रान्सफॉर्मर जळाल्याने महावितरणच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी या भागात नवीन १०० केव्ही क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बसवावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मुरूम ग्रामीणचे शाखा अभियंता गणेश शेंबाळे यांनी नवीन ट्रान्सफॉर्मरसाठी प्रस्ताव पाठवून लवकरच मंजुरी मिळवण्याचे आश्वासन दिले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून हा त्रास लवकरात लवकर थांबवावा, अशी आग्रही मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.