Double Decker Bus will be available in Diwali: Sakal
छत्रपती संभाजीनगर

Double Decker Bus: दिवाळीत मिळेल डबल डेकर बस

Double Decker Bus will be available in Diwali: शहरातील पर्यटनाला चालना देण्यासाठी महापालिकेने डबल डेकर बस घेण्याचा निर्णय घेतला.

सकाळ वृत्तसेवा

Double Decker Bus will be available in Diwali: शहरातील पर्यटनाला चालना देण्यासाठी महापालिकेने डबल डेकर बस घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार इच्छुक कंपन्यांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. तीन कंपन्यांनी निविदा सादर केली असून, त्यावर निविदा समिती निर्णय घेणार आहे. निविदा अंतिम झाल्यानंतर म्हणजेच दिवाळीपर्यंत पर्यटकांना डबल डेकर बसमधून शहर पर्यटनाची संधी मिळणार आहे.

वेरूळ, अजिंठा लेणी पाहिल्यानंतर देश-विदेशातील पर्यटकांनी शहरातील ऐतिहासिक स्थळांना भेटी द्याव्यात, त्यातून शहरात रोजगार वाढतील यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अनेक पर्यटक बीबी का मकबरा, पाणचक्की या वारसास्थळांना भेट देतात. पर्यटकांच्या संख्येत वाढ व्हावी, यासाठी महापालिकेने दोन डबल डेकर बसची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला. ‘सिटी टुरिस्ट बस’ या नावाने बस सुरू केली जाणार आहे.

या बसचा दुसरा मजला खुला (ओपन टू स्काय) राहणार आहे. अशा प्रकारच्या बस खरेदी करण्यासाठी इच्छुकांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यानुसार निविदा सादर करण्यात आल्या आहेत. दुसऱ्यांदा राबविलेल्या निविदेत तीन निविदा प्राप्त झाल्या असून, त्यात चव्हाण ऑटोडील्स (सोलापूर), चिंतामणी मोटर्स (सांगली), आदित्य इन्फ्रास्ट्रक्चर (मुंबई) अशी कंपन्यांची नावे आहेत. प्रशासक जी. श्रीकांत यांच्या आदेशानुसार तिन्हीही निविदांचे तांत्रिक बीड उघडण्यात आले आहे. त्यावर निर्णय घेण्यासाठीचा प्रस्ताव निविदा समितीसमोर ठेवण्यात येणार आहेत. निविदा समितीने निर्णय घेतल्यानंतर संबंधित कंपनीला कार्यारंभ आदेश दिले जातील. त्यानंतर पुढील तीन महिन्यांत महापालिकेला बस प्राप्त होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्सची विजयी मालिका खंडित! सनरायझर्स हैदराबादचा शानदार विजय; IPL 2026 Points Table बदललं

IPL 2026: आश्चर्यच... ना विराट, ना शुभमन Orange Cap तिसऱ्याच कुणाकडे; Purple Capवर चेन्नईच्या गोलंदाजाने निर्विवाद वर्चस्व

'काँग्रेस, काँग्रेस आणि फक्त काँग्रेस...;' मोदींचा केंद्रबिंदू त्याच नावाभोवती फिरला, संपूर्ण भाषणात किती वेळा उल्लेख केला?

SRH vs CSK Live: ४,४,४,४,४,६! आयुष म्हात्रेचं वादळ हेनरिच क्लासनने रोखलं; अविश्वसनीय झेल घेत हैदराबादचं मैदान गाजवलं Video Viral

होर्मुझ संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! समुद्री व्यापारासाठी ‘सुरक्षाकवच देणार; जहाजांसाठी मोठी खुशखबर

SCROLL FOR NEXT