छत्रपती संभाजीनगर

बिरसा मुंडा गौरव दिवस सेवा सप्ताहातून आदिवासी बांधवांना योजनांचा लाभ

CD
आदिवासींना मिळणार विविध योजनांचा लाभ ------------- बिरसा मुंडा गौरव दिवस सेवा सप्ताहात उपक्रम सकाळ वृत्तसेवा परभणी, ता.८ ः भगवान बिरसा मुंडा गौरव दिवसानिमित्त ११ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत राज्यभर सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे. या माध्यमातून आदिवासी बांधवांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासह शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक व आरोग्यविषयक सक्षमीकरणाचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. सेवा सप्ताहात १३ नोव्हेंबर रोजी पात्र लाभार्थ्यांना न्यूक्लियस बजेटअंतर्गत धनादेश वितरण, तसेच विविध शासकीय योजनांचे लाभ दिले जातील. महिला बचत गट, स्वयंरोजगार व कृषिपूरक उद्योगांना प्रोत्साहन देण्यात येईल. १४ नोव्हेंबरला आदिवासी स्मारकांची स्वच्छता व दीपोत्सव, तर १५ नोव्हेंबरला भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त गडचिरोली येथे देशस्तरीय मुख्य कार्यक्रम होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन करणार आहेत. १६ नोव्हेंबरला आधार, वनपट्टे व शासकीय योजनांसाठी विशेष सेवा शिबिरे, १७ नोव्हेंबरला आरोग्य व सिकलसेल तपासणी शिबिरे आयोजित केली जातील. १८ नोव्हेंबरला विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, जात वैधता, कौशल्य प्रशिक्षण, रोजगार, स्वयंरोजगार व आर्थिक साक्षरतेबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. आदिवासी समाजाला शासकीय सेवा व योजनांचा लाभ सुलभतेने मिळवून देत सर्वांगीण विकासाला चालना देणे, हा सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे. -------------------

Tukaram Munde Midnight Raid and First Posting Revelations : आयुक्त तुकाराम मुंढेंचा खळबळजनक गौप्यस्फोट; २००७ मधील पहिल्याच पोस्टिंगच्या वेळी मध्यरात्रीच्या धाडीचा थरारक किस्सा अन् 'त्या' फोन कॉलबद्दल केला खुलासा

Pimpri Chinchwad fire brigade : गेल्या वर्षी दिवाळीत आगीच्या ७० घटना; यंदा पिंपरी-चिंचवडमध्ये २० अग्निशमन वाहने सज्ज, २२ संवेदनशील ठिकाणांवर २४ तास लक्ष

बॉस असावा तर असा! दिवाळीला प्रत्येकाला दिला १ लाखांचा बोनस, कर्मचारी भावुक; Video Viral

Latest Marathi News Live Update: : पार्थ पवारांची शरद पवारांसोबत तब्बल दोन ते अडीच तास महत्त्वपूर्ण बैठक; दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान भेटीने वेधले राजकीय वर्तुळाचे लक्ष

Mega Clean River Mission 2029 Deadline : "२०२९ आधी नदी पूर्ण स्वच्छ करूनच जनतेसमोर येणार!"; तब्बल ८,९४१ कोटींच्या मेगा प्लॅनची घोषणा, गृहमंत्र्यांचा मोठा संकल्प

SCROLL FOR NEXT