छत्रपती संभाजीनगर

भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त बीड जिल्ह्यात जनजातीय गौरव सेवा सप्ताह सुरू

CD
जनजातीय गौरव सेवा सप्ताहाला सुरवात सकाळ वृत्तसेवा बीड, ता. १२ (बातमीदार) ः भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीचे औचित्य साधून राज्यामध्ये ११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान जनजातीय गौरव सेवा सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा पुणे आणि बीड जिल्ह्यांच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्ह्यातही विविध लोकोपयोगी आणि जनजागृतीपर उपक्रमांना सुरुवात झाली आहे. आदिवासी समाजापर्यंत विविध शासकीय योजनांचा लाभ थेट पोहोचवण्यासाठी जिल्हा प्रशासन जोमाने कामाला लागले आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत बीड जिल्ह्यात आयोजित या सेवा सप्ताहात शासकीय योजनांची माहिती देणे, आरोग्य शिबिरे, स्वच्छता मोहीम आणि विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. जिल्ह्यातील आदिवासीबहुल भागांसाठी प्रशासकीय पातळीवर विशेष नियोजन करण्यात आले आहे. वडवणी तालुक्यातील कुप्पा व खलवट निमगाव येथे १५ नोव्हेंबर रोजी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त विशेष सोहळा होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन एलईडी स्क्रीनद्वारे थेट आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. यासोबतच शिरूर कासार येथे आदिवासी नागरिकांना आधारकार्ड आणि इतर आवश्यक शासकीय कागदपत्रे मिळवून देण्यासाठी विशेष सेवा शिबिर आयोजित करण्यात आले असून, यामुळे गावकऱ्यांची मोठी सोय होणार आहे. ----- आरोग्य आणि पोषणावर विशेष भर या सप्ताहादरम्यान केवळ कागदपत्रांवरच भर न देता, आदिवासी बांधवांच्या आरोग्याचीही विशेष काळजी घेतली जात आहे. वडवणी तसेच आष्टी-पाटोदा तालुक्यांतील आदिवासीबहुल गावांमध्ये आरोग्य तपासणी व पोषण जनजागृती शिबिरे राबवली जात आहेत. आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध असून, जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी या जनजातीय गौरव सेवा सप्ताहाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले आहे.

PM Narendra Modi: 'मी कधीकाळी पत्रकारांसाठी खुर्च्याही लावायचो!' पंतप्रधान मोदींनी सांगितले फॅक्सपासून इन्स्टाग्राम रील्सपर्यंतचे भन्नाट किस्से

Pune News : ‘असलं थर्ड क्लास सुशासन आम्हाला नको, मुरलीधर मोहोळांना प्रवाशाने का सुनावलं; केंद्र सरकारच्या कारभारावरही व्यक्त केली नाराजी

India vs Pakistan Final: भारत-पाकिस्तान आशिया चषकासाठी भिडणार; लक्ष्य रायचंदानी, आर्यवीर सेहवाग सर्व हिशोब चुकता करणार...

Latest Marathi News Live Update : धक्कादायक! राज्यात अवघ्या ७ महिन्यांत रस्ते अपघातात ९,१९५ जणांचा मृत्यू

Mumbai News: मुंबईला उडवणाऱ्या धमक्यांचे सत्र सुरूच, पुन्हा बॉम्बची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर

SCROLL FOR NEXT