छत्रपती संभाजीनगर

महिला बचत गटांना आर्थिक सक्षमीकरणासाठी धनादेशांचे वितरण

CD
आदिवासी महिला बचत गटांना धनादेशांचे वाटप - जनजातीय गौरव सेवा सप्ताह; एकात्मिक प्रकल्प कार्यालयाचा उपक्रम हिंगोली, ता. १४ : क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताहा’अंतर्गत आदिवासी महिला बचत गटांना आर्थिक स्वावलंबनासाठी धनादेशांचे वितरण करण्यात आले. कळमनुरी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात शुक्रवारी (ता. १३) हा कार्यक्रम पार पडला. प्रकल्प अधिकारी डॉ. सुनील बारसे यांच्या हस्ते बचत गटांच्या प्रतिनिधींना हे धनादेश सुपूर्द करण्यात आले. याप्रसंगी लेखाधिकारी हिबारे, कार्यालय अधीक्षक भानुपारे यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘आदिवासी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि नवीन उद्योग-व्यवसायांना गती देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे,’ असे डॉ. बारसे यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यात ११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान हा जनजातीय गौरव सेवा सप्ताह उत्साहात साजरा केला जात आहे. या सप्ताहात प्रकल्प कार्यालयाच्या वतीने आदिवासी स्मारकांची स्वच्छता, दीपोत्सव, जात प्रमाणपत्रांचे वाटप, वनहक्क पट्टेधारकांना विविध शासकीय योजनांचे लाभ देणे तसेच मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. चौकट आज विविध कार्यक्रमांचे आयोजन भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त रविवारी (ता. १५) शहरात प्रभातफेरी, प्रबोधनात्मक व्याख्यान, आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारे पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम आणि भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. याच कार्यक्रमादरम्यान आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहाचे ऑनलाइन उद्घाटनही संपन्न होणार आहे. या सप्ताहाच्या माध्यमातून आदिवासी समाजाचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, परंपरा व शासकीय हक्कांची जनजागृती करून योजनांचे लाभ तळागाळातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोचवले जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Laxman Hake: लक्ष्मण हाके अंतरवाली सराटीत; दुष्काळ प्रश्नावर शेतकऱ्यांसह ओबीसी आंदोलकांशी चर्चा

8th Pay Commission: 8वा वेतन आयोग लागू होण्याआधी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचं काय होणार? एरिअर्स आणि वाढीव पेन्शन मिळणार की नाही?

Air Pollution: प्रदूषणाचा विळखा जीवघेणा! आरोग्य विम्याच्या क्लेममध्ये 3 वर्षांत 4.3 पट वाढ; पुणे देशात दुसरे

Latest Marathi News Live Update: साई संस्थानच्या बसला अचानक लागली आग.. प्रवासी भाविक सुखरूप

नगरपरिषदेच्या गच्चीवरील मटन पार्टी भोवली; अमरावती जिल्हाधिकाऱ्यांची मुख्याधिकाऱ्यांना नोटीस, दोन दिवसांत मागितला खुलासा

SCROLL FOR NEXT