छत्रपती संभाजीनगर

तुळजापूरातून घरातील सोन्या-चांदीचे दागिने लंपास

CD
तुळजापूरातून दागिने लंपास धाराशिव : तुळजापूर शहरातील एसटी कॉलनी परिसरातील बंद घराच्या कपाटातून ८५ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. एसटी कॉलनीतील रहिवासी सचिन कालीदासराव घोगरे (वय ४६) यांच्या राहत्या घरातील कपाटात ठेवलेले १४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि चांदीचे दागिने असा एकूण ८५ हजार रुपयांचा ऐवज शुक्रवारी (ता.२) दुपारी एकच्या सुमारास चोरीस गेला. विलास पद्माकर देशमुख (रा. तीर्थ तुळजापूर) याने चोरून नेल्याचा आरोप आहे. सचिन घोगरे यांनी (ता.३) दिलेल्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. ........ जवळगा मेसाई येथून एकाचे अपहरण तुळजापूर : तुळजापूर तालुक्यातील जवळगा मेसाई येथून एका ४५ वर्षीय व्यक्तीचे अज्ञात कारणासाठी अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे. जवळगा मेसाई येथील रहिवासी मधुकर उद्धव कदम (वय ४५) हे १७ सप्टेंबरला दुपारी चारच्या सुमारास गावातून अचानक गायब झाले. अज्ञात व्यक्तीने त्यांना गुप्तपणे व बेकायदेशीरपणे डांबून ठेवण्याच्या उद्देशाने पळवून नेल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी त्यांची आई मंगल उद्धव कदम (वय ६२) यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरून शनिवारी (ता.३) तुळजापूर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंद केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar: ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणारं २० वर्षे जुनं प्रकरण काय? PWD कनेक्शन नेमकं काय?

सिल्लोड-जळगाव महामार्गावर भीषण अपघात; पालोद येथे भरधाव ट्रकच्या धडकेत १५ वर्षीय बालकाचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : मालेगाव मध्ये तापमान 38.2 अंशावर पोहचले

Noida Crime : सातव्या महिन्यातच मुलाचा जन्म, उपचारासाठी खर्च झाले ४० लाख; इंजिनिअरने कर्ज, तवाणावातून ४३ व्या मजल्यावरुन उडी मारुन जीवन संपवले

Pitru Paksha 2026: सर्वपित्री अमावस्येला नवरात्रीच्या पूजेचे सामान खरेदी करावे की नाही? जाणून घ्या नियम...

SCROLL FOR NEXT