छत्रपती संभाजीनगर

हळद पिकावरील कंदमाशी, रोग व अन्नद्रव्य कमतरतेचे व्यवस्थापन

CD
हळद पिकावर कंदमाशी, करपाचा प्रादुर्भाव -------- योग्य व्यवस्थापनाचा तज्ज्ञांचा शेतकऱ्यांना सल्ला सकाळ वृत्तसेवा परभणी, ता. ८ ः हळद पिकात सध्या कंदमाशीचा प्रादुर्भाव तसेच करपा, पानांवरील ठिपके, कंदकुज, पालाश व सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आढळत आहे. या पार्श्वभूमीवर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्रातील डॉ. गजानन गडदे, डॉ. दिगंबर पटाईत व मधुकर मांडगे यांनी शेतकऱ्यांना योग्य व्यवस्थापनाचा सल्ला दिला आहे. कंदमाशीचा प्रादुर्भाव जास्त असल्यास शिफारशीनुसार क्विनॉलफॉस किंवा डायमेथोएटची फवारणी करावी. कंद उघडे पडू नयेत यासाठी मातीची भर द्यावी तसेच शेत स्वच्छ व तणमुक्त ठेवावे. करपा व पानांवरील रोगांसाठी प्रादुर्भावानुसार शिफारस केलेल्या बुरशीनाशकांची फवारणी करावी. कंदकुज टाळण्यासाठी शेतात पाणी साचू न देता निचरा करावा व ट्रायकोडर्माचा वापर करावा. पालाशाच्या कमतरतेत जुन्या पानांच्या कडा पिवळ्या होऊन तपकिरी पडतात. ही लक्षणे करप्यासारखी दिसू शकतात. त्यामुळे योग्य निदान करूनच उपाययोजना करावी. पालाश व सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास शिफारशीनुसार सल्फेट ऑफ पोटॅश व ग्रेड- २ सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करावी. ((चौकट))) फवारणी करताना घ्या काळजी फवारणी करताना औषधाचे लेबल व शिफारस केलेले प्रमाण तपासावे. कडक उन्हात फवारणी टाळून सकाळी किंवा सायंकाळी फवारणी करावी. अनावश्यकपणे विविध औषधे एकत्र मिसळू नयेत. तसेच संरक्षक साधनांचा वापर करावा, असे आवाहन कृषी विद्यापीठाच्यातीने करण्यात आले आहे. ------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIR voter list: देशातील 42 निवृत्त न्यायमूर्तींचं खुलं पत्र! SIR वरुन सुरु असलेल्या वादावर स्पष्ट केली भूमिका

India Alliance Protest : 'देश हायजॅक केलाय, लोकशाहीची हत्या सुरूय'; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, आंदोलनासाठी 300 खासदार राजघाटावर

NANA PATEKAR: नाना पाटेकर रोज ६० सिगारेट ओढायचे; वयाच्या ५६व्या वर्षी सोडली सवय, पण हृदयाला झालेलं नुकसान भरून निघतं का? जाणून घ्या

Latest Marathi News Live Update: इंडिया आघाडीचे खासदार राजघाटावर

Nana Patekar Death : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे Cardiac Arrest ने निधन; हार्ट अटॅक आणि कार्डियाक अरेस्टमध्ये काय फरक असतो? शरीरात नेमकं काय घडतं?

SCROLL FOR NEXT