sambhaji nagar  sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar Crime : देहविक्री रॅकेटमधील तुषार राजपूतला दणका ; बँक खात्यातील २८ लाख रुपये गोठविले

सिडको पोलिसांनी बीड बायपास सेनानगर येथील हायप्रोफाईल कुंटणखाना उघडकीस आणला आहे. या कुंटणखान्याचा मुख्य सूत्रधार कुख्यात गुन्हेगार तुषार राजपूतला अटक करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : सिडको पोलिसांनी बीड बायपास सेनानगर येथील हायप्रोफाईल कुंटणखाना उघडकीस आणला आहे. या कुंटणखान्याचा मुख्य सूत्रधार कुख्यात गुन्हेगार तुषार राजपूतला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी तपासात राजपुत याची दोन बँक खाती सिझ करीत २८ लाख रुपये होल्ड केले आहे.

सिडको पोलिस ठाण्याच्या पथकाने एन-सात भागातील कुंटणखाना आणि त्यातून मिळालेल्या माहितीवरुन बीड बायपास येथील सेनानगर येथे उच्चभ्रू वसाहतीत चालणारा हायप्रोफाईल कुंटणखाणा उघडकीस आणला. यामध्ये ‘पीटा’ अॅक्टचे गुन्हे दाखल असलेला तुषार राजपूत याच्यासह पाच आरोपींना अटक केली होती. यावेळी उझबेगिस्तान येथील तरुणीसह दिल्लीच्या दोन तरुणींची सुटका केली.

राजपूतवर यापूर्वी देखील अनेक गुन्हे दाखल आहेत. सिडकोच्या पोलिस निरीक्षक गीता बागवडे या प्रकरणी सखोल तपास करीत आहे. तपासात संशयित आरोपी राजपूतने या रॅकेटमध्ये ऑनलाईन ट्रान्झॅक्शनच्या माध्यमातून मोठा आर्थिक व्यवहार केल्याचे समोर आले आहे. एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेमध्ये त्याची खाती असल्याचे समोर आले आहे. या खात्यामध्ये २८ लाख रुपये असून पोलिसांनी बँकांना ही खाती ‘सीझ’ करण्याबाबत पत्रव्यव्हार केला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे राजपूतच्या आर्थिक नाड्या आवळल्या गेल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Cabinet Meeting: सिडको आणि म्हाडाच्या प्रकल्पांसाठी नवीन धोरण तयार करणार अन्...; महायुती मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

Post-COVID Diabetes Surge: कोरोनानंतर आरोग्याचे नवे संकट; बदललेल्या जीवनशैलीमुळे मधुमेहाच्या रुग्णांत वाढ

Latest Marathi Breaking News: नाराज इच्छूकांनी अर्ज माघारी घ्यावेत- हसन मुश्रीफ

Sangli Politics: ईश्वरपूरमध्ये उमेदवारीचा पाऊस! ३० जागांसाठी तब्बल २७२ अर्ज; नगराध्यक्षपदासाठी १४ दिग्गज रिंगणात

Sangli politics: आटपाडीत उमेदवारीची झुंबड! २२ नगराध्यक्ष आणि १९७ नगरसेवक अर्जांनी पहिल्याच निवडणुकीची रंगत वाढवली

SCROLL FOR NEXT