छत्रपती संभाजीनगर

शाॅर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत दुचाकींसह दोन दुकाने जळून खाक, ग्रामस्थांमुळे मोठा अनर्थ टळला

विकास पाटील

बनोटी (जि.औरंगाबाद) : शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत दोन दुचाकींसह दोन दुकाने जळून खाक झाल्याची घटना गोदेंगाव (ता.सोयगाव) येथील चौफुलीवर मंगळवारी (ता.१०) मध्यरात्री घडली. या आगीत जवळपास आठ लाखांचे नुकसान झाल्याची घटना घडली. सोयगाव तालुक्यातील गोदेंगाव चौफुलीवरती मगलसिंग पवार यांचे स्वामी समर्थ ऑटो पार्ट व गॅरेज असून बाजूलाच दीपक पाखले यांचे किराणा दुकान आहे. संध्याकाळी दुकाने बंद करुन मालक घरी गेले. मात्र, मध्यरात्री दोन ते तीन वाजेच्या सुमारास दुकानात शॉर्टसर्किट होऊन आग लागली.


या आगीत दोन्ही दुकानातील सर्व सामान जळून खाक झाले. स्वामी समर्थ ऑटो पार्टमधील दोन दुचाकीसह साहित्य असा एकूण जवळपास ४ लाख ५० हजाराचे नुकसान झाले आहे तर किराणा दुकानातील फ्रिज, कुलर, फर्निचर, आइस्क्रीमचे बॉक्स, तसेच किराणा सामान आदी साहित्य असे जवळपास ४ लाखांचे नुकसान झाले.
माहिती मिळताच मंडळ अधिकारी मारोती धोंडकर, तलाठी जी.आर. चांदे, बनोटी चौकीचे जमादार सुभाष पवार, दिलीप तडवी, श्रीकांत पाटील, विकास दुबेले आदींनी पंचनामा केला. यावेळी पोलिस पाटील मनोहर निकम, मगलसिंग पवार, दिपक पाखले, शरद निकम, अतुल बोरसे, शरद महालपुरे आदी ग्रामस्थांनी मदत देण्याची मागणी केली आहे.


मोठा अनर्थ टळला
गोंदेगाव चौफुली हे गजबजले ठिकाण असून या ठिकाणी छोटे मोठे व्यापारी संकुले आहेत. ग्रामस्थांनी अग्निशमन दलाची गाडी येण्यापूर्वी आग आजूबाजूच्या दुकानांना कवेत घेऊ नये यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानेच आग नियंत्रण राखण्यात यशस्वी झाल्याने मोठी हानी होण्यापासून टळली.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-US War: मोटरबोटवरून पाठलाग, मास्क घालून जहाजावर चढले अन्...; इराणने होर्मुझमध्ये भारतीय जहाज कसे पकडले? पाहा थरारक व्हिडिओ

Video Viral: पाकिस्तानी गोलंदाजाने आज मार खाल्लाच असता... फलंदाजाने बॅट उगारली, दोघांनी अडवले नाहीतर घडला असता अनर्थ...

7th Pay Commission: 'या' कर्मचाऱ्यांची चांदी! ७ व्या वेतन आयोगाचा मार्ग मोकळा; योगी सरकारकडून पगारवाढीचं मोठं 'गिफ्ट'!

बदमाश पाकिस्तानी ! Mohsin Naqvi ने पत्रकाराला किडनॅप केले? PCB प्रमुखावर गंभीर आरोप, एका Video ने जगभरात खळबळ

State Cooperative Bank Profit: सामाजिक बांधिलकीसह आर्थिक बळकटी; राज्य सहकारी बँकेचा नफा ७०२ कोटींवर, सहकार क्षेत्रासाठी नवा आदर्श

SCROLL FOR NEXT