छत्रपती संभाजीनगर

संचमान्यतेसाठी ‘यू-डायस’ची माहिती अद्ययावत करण्याचे निर्देश

CD
संचमान्यतेसाठी ‘यू-डायस’ची माहिती अद्ययावत करण्याचे निर्देश - विभागातील ८० महाविद्यालयांची प्रक्रिया अजून अपूर्ण ------------------------------ छत्रपती संभाजीनगर, ता. २ : सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील संचमान्यता प्रक्रियेसाठी ‘यू-डायस’ आणि ‘सरल’ पोर्टलवरील माहिती अद्ययावत करण्याचे निर्देश शिक्षण संचालनालयाने दिले आहेत; पण, छत्रपती संभाजीनगर विभागातील ७४४ पैकी सुमारे ८० कनिष्ठ महाविद्यालयांची संचमान्यतेची प्रक्रिया अजून अपूर्ण आहे. अशा महाविद्यालयांना ‘यू-डायस’ची माहिती अद्ययावत करण्यासाठी १६ सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. शासन निर्णय तसेच सुधारित संचमान्यता निकषांनुसार सध्या संचमान्यतेची प्रक्रिया राबविण्यात येत असून, शिक्षणाधिकाऱ्यांच्या लॉगिनला संचमान्यतेची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाची संचमान्यता ‘यू-डायस’ व ‘सरल’ पोर्टलवरील माहितीच्या आधारे करण्यात येणार आहे. यू-डायस पोर्टलवर नोंद असलेल्या ३० सप्टेंबरच्या पटसंख्येच्या आधारावर प्रमाणित विद्यार्थी संख्येनुसार शिक्षणाधिकाऱ्यांच्या लॉगिनला माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. संचमान्यता प्रक्रियेसाठी यू-डायस व सरल पोर्टलवरील शाळा, तुकडी, माध्यम, शाळा व्यवस्थापन प्रकार, कार्यरत पदे, विद्यार्थी तपशील, विद्यार्थी आधार प्रमाणीकरण आदी माहिती महाविद्यालयांना अद्ययावत करावी लागेल. त्यासाठी शैक्षणिक सत्रातील विद्यार्थी तपशील तसेच दोन्ही पोर्टलवरील माहिती क्षेत्रीय स्तरावरील यंत्रणेच्या सहकार्याने १६ सप्टेंबरपूर्वी अद्ययावत करण्याचे निर्देश असल्याचे शिक्षण उपसंचालक कैलास दातखीळ यांनी सांगितले. ---- नोंदीत एकसमानता हवी माहिती अद्ययावत करताना यू-डायस व सरल पोर्टलवरील नोंदींमध्ये एकसमानता राहील, याची दक्षता घेण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. याबाबत विभागीय शिक्षण उपसंचालकांनीही संबंधित यंत्रणेला सूचना दिल्या आहेत. ---- त्रुटींमुळे संचमान्यता रिजेक्ट शिक्षण उपसंचालक कार्यालयाला ६४ महाविद्यालयांच्या प्रकरणात त्रुटी आढळल्या. त्यामुळे त्यांची संचमान्यता रिजेक्ट करण्यात आली. या महाविद्यालयांना आता नव्याने माहिती अपडेट करावी लागेल. मात्र, रिजेक्ट केलेल्या महाविद्यालयांच्या फाइल आता सापडत नसल्याने शिक्षण उपसंचालक कार्यालयातील अधिकारी मेटाकुटीला आल्याचे सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidyanand Bapat: विद्यानंद बापट यांच्याविरोधात पोलिस तक्रार देणार; शिक्षणतज्ज्ञ धनंजय कुलकर्णींकडून 'नक्षली' असा उल्लेख

सायबर कॅफेतून सुरू झाला प्रवास, २७-२८ चित्रपटांचा अनुभव; आता रोहन शाह करणार निर्मितीची नवी सुरुवात

Champions Trophy Dates: भारतात महिला वर्ल्ड कपनंतर रंगणार चॅम्पियन्स ट्रॉफी! कधी अन् कोणत्या शहरात होणार सामने? ICC ची घोषणा

Mumbai ST Stop Demand: मुंबई-सातारा-कराड-कोल्हापूर एसटी बसला चेलाडी फाटा येथे अधिकृत थांबा देण्याची आमदार शंकर मांडेकर यांची परिवहन मंत्र्याकडे मागणी

पहिलीच मालिका हिट पण नंतर कुठे गायब झाली 'येऊ कशी तशी मी नांदायला'ची स्वीटू? करिअरच्या टॉपवर असतानाच घेतलेला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT