छत्रपती संभाजीनगर

सामान्य रुग्णालयातील कथित अनियमिततेच्या

CD
उदगीरच्या सामान्य रुग्णालयातील कारभाराची चौकशी उदगीर, ता. २५ (बातमीदार) : उदगीर येथील सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामकाजासह घरभाडे भत्त्याच्या कथित अनियमिततेप्रकरणी प्राप्त झालेल्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी आरोग्य विभागाने चौकशी समिती स्थापन केली आहे. तक्रारींची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश उपसंचालक, आरोग्य सेवा, लातूर मंडळ यांनी दिले आहेत. शिवसेनेचे लातूर ग्रामीण जिल्हाप्रमुख चंद्रकांत टेगेटोल यांनी रुग्णालयाच्या कारभाराबाबत मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीत रुग्णालयातील नॉन प्रॅक्टिसिंग अलाउन्स (एनपीए), घरभाडे भत्ता आणि कर्तव्यावरील गैरहजेरीसह विविध मुद्दे उपस्थित करण्यात आले होते. रुग्णालयातील काही वैद्यकीय अधिकारी गैरहजर राहत असल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयात रेफर करावे लागत आहे, आयसीयू बंद, स्वच्छतेचा अभाव, वैद्यकीय अधिकाऱ्यांचा बायोमेट्रिकशिवाय पगार काढला जातो, असा आरोपही करण्यात आला आहे. तक्रारीची दखल घेत उपसंचालकांनी चौकशीचे आदेश जारी केले आहेत. यासाठी तीन सदस्यीय समिती नियुक्त केली असून अध्यक्षपदी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकरकर आणि सदस्य म्हणून वैद्यकीय अधीक्षक डॉ. इस्माईल मुल्ला, वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंचल बोडके यांचा समावेश करण्यात आला. दरम्यान, समितीने अहवाल उपसंचालक कार्यालयात सादर करावा, असेही निर्देश देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : मल्लिकार्जुन खरगेंचं वादग्रस्त वक्तव्य; PM मोदींबद्दल बोलताच कार्यक्रमात गोंधळ, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून एकाला मारहाण, नेमकं काय घडलं?

Madhuri Dixit Kon Honaar Karodpati : "बाई, तुम्ही खूप कडक बोलताय..."; शिक्षिकेसमोर थेट विद्यार्थी बनली माधुरी दीक्षित! 'कोण होणार करोडपती'मधील सुंदर क्षणाचा व्हिडिओ व्हायरल!

Latest Marathi News Update : नवी मुंबईत आकाराला येणार अत्याधुनिक दागिने उत्पादन केंद्र; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते 'इंडिया ज्वेलरी पार्क'चा शुभारंभ!

Manoj Jarange: ‘कितीही प्रयत्न झाले तरी सत्य बाहेर आणणारच’; ऑडिओ क्लिप प्रकरणावरून मनोज जरांगे आक्रमक

''वृक्षतोडीबाबत ‘फेक नॅरेटिव्ह’ पसवण्याचा प्रयत्न'', CM फडणवीसांनी सांगितलं कर्जतमधील टोरेंट प्रकल्पाचं महत्त्वं, काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT