गणेशोत्सवाच्या बंदोबस्ताची रंगीत तालीम
गणेशोत्सवासाठी उदगीर पोलिस सज्ज; ड्रोनद्वारे असणार नजर
--
उदगीर, ता. १४ (बातमीदार) ः आगामी गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावा, यासाठी उदगीर पोलिस प्रशासनाने कंबर कसली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रविवारी (ता. १३) शहरातील मुख्य बाजारपेठ, संवेदनशील व अतिसंवेदनशील भाग तसेच मिश्र वस्त्यांमधून पोलिसांनी संचलन केले. यावेळी जमाव नियंत्रण व विसर्जनाची रंगीत तालीम घेऊन पोलिसांच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.
पोलिस ठाणे उदगीर शहरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बिरप्पा भुसनूर आणि पोलिस ठाणे उदगीर ग्रामीणचे पोलिस निरीक्षक दिलीप गाडे यांच्या नेतृत्वाखाली हे संचलन पार पडले. गणेशोत्सव काळात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिसांकडून विविध उपाययोजनांची रंगीत तालीम करण्यात आली. या संचलन व रंगीत तालीममध्ये १० पोलिस अधिकारी, १२० पोलसि अंमलदार, ६० होमगार्ड, एक एसआरपीएफ सेक्शन आणि एक दंगा नियंत्रण पथक सहभागी झाले होते.
--
ड्रोनद्वारे शहरावर नजर
गणेशोत्सवाच्या काळात शहरातील विविध भागांवर ड्रोनच्या माध्यमातून करडी नजर ठेवण्यात येणार आहे. गर्दीची ठिकाणे, मिरवणुकीचे मार्ग तसेच संवेदनशील भागांमध्ये पोलिसांकडून विशेष लक्ष दिले जाणार आहे. कोणत्याही अनुचित प्रकाराला वेळीच आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे.
--
सोशल मीडियावरही पोलिसांची नजर
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावरील हालचालींवरही पोलिसांचे लक्ष राहणार आहे. वादग्रस्त, आक्षेपार्ह किंवा सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट, संदेश अथवा अफवा प्रसारित करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. यासाठी सायबर सेल सतर्क ठेवण्यात आला आहे.
--
अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
गणेशोत्सव हा सामाजिक सलोखा आणि बंधुभाव वाढविणारा उत्सव असून, नागरिकांनी शांतता व सामाजिक सलोखा कायम ठेवत उत्सव साजरा करावा. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच आक्षेपार्ह किंवा सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट प्रसारित अथवा शेअर करू नयेत, असे आवाहन पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
--
फोट़ोओळ
उदगीर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मुख्य बाजारपेठ, संवेदनशील व अतिसंवेदनशील भाग तसेच मिश्र वस्त्यांमधून संचलन कराताना पोलिस.
-
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.