छत्रपती संभाजीनगर

उदगीर ते नांदेड बससेवा सुरु करावे खासदार काळगे यांचे विभागीय

CD
‘उदगीर-नांदेड बस कापसी, गोळेगावमार्गे सुरू करा’ जळकोट, ता.१३ (बातमीदार) ः उदगीर ते नांदेड बस सेवा जांब, मुखेड, कौठा, हाळदा, लाडका, गोळेगाव, कापसी, मारतळा मार्गे चालु करण्याची शिफारस खासदार शिवाजी काळगे यांनी विभागीय नियंत्रक, लातूर यांच्याकडे केली आहे. कापसी, गोळेगाव परिसरातील नागरिकांनी उद‌गीर ते नांदेड बस सेवा जांब, मुखेड, कौठा, हाळदा, लाडका, गोळेगाव, मारतळा, काटकळंबा व कापसी सदर गावांमार्गे सकाळी एक फेरी व दुपारी एक फेरी सुरु करण्याची मागणी केली आहे. या मार्गावर नियमित बससेवा उपलब्ध नसल्यामुळे परिसरातील नागरिकांसह शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रवासासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. सदर बससेवा सुरू झाल्यास या गावांतील नागरिकांना नांदेड, उदगीर व इतर प्रमुख ठिकाणी ये-जा करणे सुलभ होईल.वरील अनुषंगाने, संबंधित गावांतील नागरिकांची गरज व विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेऊन उदगीर ते नांदेड बस सेवा जांब, मुखेड, कौठा, हाळदा, लाडका, गोळेगाव, मारतळा, काटकळंबा व कापसी गावांमार्गे सकाळी एक फेरी व दुपारी एक फेरी सुरू करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याची मागणी खासदार काळगे यांनी केली आहे.‘

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Rally: शेअर बाजारात तुफान तेजी! गुंतवणूकदारांची चांदी; सेन्सेक्स १,१०९ अंकांनी वधारला

Pregnant journalist allegation: गर्भवती महिला पत्रकाराला राहुल गांधींनी धक्का दिल्याचा आरोप; 'एक्स-रे'वरून काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न

Latest Marathi News Live Update: ज्ञानेश कुमार हे माफिया आहेत- संजय राऊत

WTC Points Table: ऑस्ट्रेलियाच्या विजयाने भारताच्या WTC Final खेळण्याच्या स्वप्नाचा चुराडा? जाणून घ्या समीकरण

Pune News : गंभीर आजारी वडिलांचे पालकत्व मुलीकडे; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय, ‘पेरेन्स पॅट्रिए’ तत्त्वाचा आधार

SCROLL FOR NEXT