छत्रपती संभाजीनगर

उदगीरमधील प्रभाग दोनमध्ये क्रीडांगण विकसित होणार

CD
उदगीरमधील प्रभाग दोनमध्ये क्रीडांगण विकसित होणार! -- जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी नगरपालिकेकडून प्रस्ताव मागविला -- उदगीर, ता.१८ (बातमीदार) : शहरातील प्रभाग क्रमांक-२ मधील नागरिकांसाठी आरक्षित जागेवरील क्रीडांगण विकसित करण्याच्या मागणीला आता प्रशासकीय स्तरावर सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. उदगीर नगर परिषदेचे नगरसेवक इम्रान सय्यद यांनी केलेल्या मागणीची दखल घेत जिल्हा क्रीडा अधिकारी जयराज मुंडे यांनी संबंधित जागेवर क्रीडांगण विकासाचा परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याबाबत उदगीर नगर परिषदेला पत्राद्वारे कळविले आहे. प्रभागाचे नगरसेवक इम्रान सय्यद यांनी प्रभाग क्रमांक २ मधील आरक्षित जागेवर क्रीडांगण उभारण्याच्या दृष्टीने माजी क्रीडामंत्री आमदार संजय बनसोडे व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे क्रीडांगण विकसित करण्याबाबत मागणी केली आहे. क्रीडांगण विकसित झाल्यास परिसरातील लहान मुले, युवक, खेळाडू तसेच नागरिकांना क्रीडा व शारीरिक व्यायामासाठी हक्काची जागा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. स्थानिक पातळीवर क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन मिळण्याबरोबरच उदयोन्मुख खेळाडूंनाही आपले कौशल्य विकसित करण्याची संधी मिळू शकते. नगरसेवक इम्रान सय्यद यांनी नागरिकांची गरज लक्षात घेऊन हा विषय सातत्याने प्रशासनाकडे मांडला. त्यांच्या पाठपुराव्याला जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने उदगीर नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात या मागणीचा उल्लेख करून क्रीडांगण विकास योजनेअंतर्गत क्रीडांगणाचा परिपूर्ण प्रस्ताव कार्यालयाकडे सादर करण्याचे पत्राद्वारे कळविले आहे. आता उदगीर नगर परिषदेने आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव तातडीने सादर करून पुढील प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करावी आणि प्रत्यक्ष क्रीडांगण विकासाच्या कामाला गती द्यावी, अशी अपेक्षा नगरसेवक इम्रान सय्यद व प्रभागातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे. ----

UPI Payment: ग्राहकांसाठी महत्त्वाचे! देशात उद्या 45 मिनिटं बंद राहणार यूपीआय सेवा; पैशांची देवाण-घेवाण होणार नाही

रुपाली चव्हाण यांची राष्ट्रीय योगा रेफ्री पदावर नियुक्ती

Junnar Farmers : शेतीचा वाढता उत्पादन खर्च रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा मोठा निर्णय; बनकर फाट्यात कांदा लागवड ७००, पुरुष मजुरी ८०० आणि इतर कामांसाठी ५०० रुपये दर

Instagram वर ब्लू टिकसाठी आता पैसे देण्याची गरज नाही! जाणून घ्या अकाउंट मोफत व्हेरिफाय करण्याची सोपी ट्रिक...

Satara Bank Election: जिल्हा परिषदेचा बदला घेतला, शिवसेना-राष्ट्रवादीनं भाजपचा वचपा काढला

SCROLL FOR NEXT