छत्रपती संभाजीनगर

उकडीच्या मोदकांनाही बसली महागाईची झळ

CD
अँकर पान ३ -- उकडीच्या मोदकांनाही बसली महागाईची झळ एक मोदक ४० रुपयांचा; २१ मोदकांसाठी मोजावे लागणार ८४० रुपये --- जळकोट, ता. १२ (बातमीदार) ः गणरायाच्या नैवेद्यातील मानाचा पदार्थ असलेल्या उकडीच्या मोदकाला यंदा महागाईचा तडका बसला आहे. गणरायाच्या नैवेद्यासाठी २१ मोदकांची परंपरा असताना मोठ्या आकाराच्या एका मोदकासाठी ४० रुपये मोजावे लागत असल्याने २१ मोदकांसाठी तब्बल ८४० रुपये खर्च येणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत मोदकांच्या दरात वाढ झाली असून, मध्यम आकाराचा मोदक ३० ते ३५ रुपये, तर मोठा मोदक ४० रुपयांना मिळत आहे. नारळ, गूळ, साखर, तूप, वेलची, जायफळ आणि गॅसच्या वाढलेल्या दरांचा परिणाम मोदकांच्या किमतीवर झाला आहे. उकडीचे मोदक दिसायला आकर्षक आणि चवीला स्वादिष्ट असल्याने त्यांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. गतवर्षी मोदकाचा दर २५ ते ३० रुपये होता. यंदा मध्यम आकाराच्या मोदकाचा दर ३० ते ३५ रुपये, तर मोठ्या मोदकाचा दर ४० रुपये आहे. तळणीचे मोदक प्रामुख्याने होमात आहुती देण्यासाठी खरेदी केले जातात. उकडीच्या मोदकांसाठी तांदळाचे पीठ, किसलेला गूळ, खोवलेला नारळ, वेलची पूड आणि जायफळ पूड यांसारखे साहित्य आधीच तयार करून ठेवावे लागते. मोदक बनविण्यासाठी वेळही अधिक लागतो. त्यामुळे पूर्वतयारीनिशी पाककृती करावी लागते. गणेशोत्सवाच्या पहिल्या तीन दिवसांत एका उद्योजिकेकडून सुमारे एक ते दीड हजार मोदक तयार केले जातात. --- मोदकांचे दर असे... उकडीचा मोदक ः ४० रुपये नग उकडीचा मोद‌क फ्लेवर्ड (मँगो, गुलकंद) : ४५ रुपये नग तळणीचा मोदक: २० रुपये खवा मोदक ः ७५० रुपये किलो चॉकलेट मोदक: १००० रुपये किलो --- नारळ, गूळ, गॅस, साखर, तूप, वेलची, जायफळ या सगळ्यांचे दर वाढले आहेत. त्यामुळे यंदा उकडीच्या मोदकाचे दर अपेक्षेपेक्षा वाढले. गेल्यावर्षी २२ ते २५ रुपयांना मिळणारा मोदक यंदा ३० ते ३५ रुपयांना मिळणार आहे. एका दिवसात किमन हजार मोदक करतो. तळणीचे मोदक बरेच दिवस टिकतात. त्यामुळे त्यांचीही मागणी गणेश मंडळांकडून अधिक आहे. - विनोज जोशी, मोदक व्यापारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: १५ वर्षांच्या वैभव सूर्यंवशीसमोर बुमराहचा यॉर्कर अन् बाऊन्सरचा मारा! सरावावेळी नेमकं काय घडलं?

Civic Body Clash: स्वच्छता साहित्य डीबीटीने देणे अशक्य; महापालिका प्रशासनाचा फेरप्रस्ताव, स्थायी समितीशी संघर्षाची शक्यता

नितीन गडकरींना मुंबईतील वाहतूक कोंडीचा फटका; नियोजित कार्यक्रमात पोहोचण्यास तासभर उशीर; म्हणाले, जुन्या उड्डाणपुलांऐवजी...

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

Youth Sena Leader Car Crash: युवासेना पदाधिकाऱ्याच्या थारची दुचाकीला धडक; कामगार गंभीर जखमी, खर्च न दिल्याचा आरोप करत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT