छत्रपती संभाजीनगर

परभणीत ‘उमेद मॉल’; बचतगटांना कायमस्वरूपी बाजारपेठ

CD
परभणीत ‘उमेद मॉल’; बचतगटांना कायमस्वरूपी बाजारपेठ ----------- -१२ हजार महिला समूहांच्या उत्पादनांना वर्षभर विक्रीची संधी सकाळ वृत्तसेवा परभणी, ता. २१ ः ग्रामीण भागातील महिला बचतगटांनी तयार केलेल्या खाद्यपदार्थ, हस्तकला, गृहउपयोगी वस्तू, अन्य उत्पादनांना आता वर्षभर विक्रीसाठी कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या (उमेद) दुसऱ्या टप्प्यात राज्यातील २१ जिल्ह्यांत ‘उमेद मॉल’ अर्थात, जिल्हा विक्री केंद्र सुरू करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. यात परभणी जिल्ह्याचाही समावेश असून, जिल्ह्यातील सुमारे १२ हजार महिला स्वयंसहाय्यता समूहांच्या उत्पादनांना या माध्यमातून थेट ग्राहकांपर्यंत पोचण्याची संधी मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची अंमलबजावणी राज्यातील ३४ जिल्ह्यांमधील ३५१ तालुक्यांत सुरू आहे. अभियानाच्या माध्यमातून मोठ्या संख्येने महिला स्वयंसहाय्यता समूह स्थापन झाले असून, अनेक महिला विविध लघुउद्योग व व्यवसायाच्या माध्यमातून उत्पन्नाचे साधन निर्माण करीत आहेत. या समूहांकडून विविध प्रकारच्या वस्तूंचे उत्पादन केले जाते. मात्र, उत्पादनांच्या नियमित विक्रीसाठी कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध नसल्याने अनेकदा प्रदर्शन, मेळावे आणि आठवडे बाजारांवर अवलंबून राहावे लागत होते. सध्या महालक्ष्मी सरस, जिल्हा व विभागस्तरीय सरस प्रदर्शन, विविध विक्री मेळावे तसेच आठवडी बाजारातील स्टॉलच्या माध्यमातून बचतगटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळते. त्याचबरोबर ‘उमेद मार्ट’ या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मसह ॲमेझॉन, फ्लिपकार्ट यांसारख्या ऑनलाइन माध्यमांवरही उत्पादनांची विक्री करण्यासाठी समूहांना संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. आता जिल्हा स्तरावर ‘उमेद मॉल’ सुरू झाल्यानंतर या उपक्रमांना कायमस्वरूपी विक्री केंद्राची जोड मिळणार आहे. दुसऱ्या टप्प्यात छत्रपती संभाजीनगर विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड, जालना, लातूर या पाच जिल्ह्यांमध्ये ‘उमेद मॉल’ उभारण्यात येणार आहेत. या केंद्रांमध्ये विविध महिला स्वयंसहाय्यता समूहांनी तयार केलेली उत्पादने एकाच छताखाली ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत. ((चौकट))) वर्षभर एकाच ठिकाणी विक्रीची संधी बचतगटांच्या महिलांना आतापर्यंत उत्पादनांच्या विक्रीसाठी ठरावीक कालावधीत होणाऱ्या प्रदर्शन, मेळावे किंवा आठवडे बाजारांची प्रतीक्षा करावी लागत होती. त्यामुळे नियमित विक्री आणि ग्राहकांशी सातत्यपूर्ण संपर्क ठेवण्यास मर्यादा येत होत्या. ‘उमेद मॉल’ सुरू झाल्यानंतर वर्षभर एकाच ठिकाणी उत्पादनांची विक्री करता येणार असल्याने ही अडचण दूर होण्याची शक्यता आहे. --- ब्रँडिंगसह उत्पन्नवाढीलाही चालना विविध समूहांची उत्पादने एकाच केंद्रावर उपलब्ध झाल्यामुळे ग्राहकांना स्थानिक महिला उद्योजकांच्या उत्पादनांची मोठी विविधता मिळणार आहे. त्याचबरोबर उत्पादनांचे ब्रँडिंग, पॅकेजिंग आणि बाजारपेठ विस्तारास मदत होऊन ग्रामीण महिलांच्या उद्योगांना अधिक चालना मिळण्याची अपेक्षा आहे. कायमस्वरूपी बाजारपेठेमुळे महिला स्वयंसहाय्यता समूहांच्या उत्पन्नवाढीस तसेच व्यवसाय विस्तारास हातभार लागण्याची शक्यता आहे. ----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC : एमपीएससीच्या मुलाखती पुढे ढकलल्या; पात्र उमेदवारांवर मोठा अन्याय

Traffic Challan: कारमध्ये गाणं वाजवलं तर लागणार मोठा दंड, गाडी जप्तही होऊ शकते; काय आहे नियम?

Marathi News Live Updates: पुण्यात गहाळ झालेली रोकड पोलिसांनी दोन दिवसांत शोधली

Vishwa Shanti Yatra : आंतरिक शांतीतून विश्वशांती; अभूतपूर्व 'विश्व शांती यात्रा २०२६'चे आयोजन

Apple Layoffs: दोन महिन्यांत दुसऱ्यांदा कपात; Fitness+ मधील ‘या’ टीमवरही आता गदा

SCROLL FOR NEXT