भारनियमन
भारनियमन Sakal
छत्रपती संभाजीनगर

आडूळ परिसरात महावितरणचे अघोषित भारनियमन

मुनाफ शेख

आडूळ - परिसरात महावितरणने सुरु केलेल्या अघोषित भारनियमनामुळे शेतकरी राजा हैराण असून दुसरीकडे व्यापाऱ्यांनाही याचा फटका बसला असून सामान्य नागरिकांचाही भारनियमनामुळे चांगलाच घामटा निघत असल्यामुळे आडूळ परिसरात महावितरणविरुध्द नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसांपासून आडूळ ३३ केव्ही उपकेंद्रा अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक गावात अघोषित भारनियमन केले जात असल्याने शेतकऱ्यांची पिके पाण्या अभावी कोमेजून जात आहे तर वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने व्यापाऱ्यांची दुकाने दिवसातून अनेक तास बंद राहात आहे. यामुळे व्यापारी सध्या भारनियमनामुळे त्रस्त झाले आहेत.

सध्या कडक उन्हाळा जाणवत असल्याने उकाडा वाढून शरीराची लाहीलाही होत आहे. त्यात मुस्लिम समाज बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरु झाल्याने मुस्लिम बांधव रोजा (उपवास) ठेवतात. मात्र, सतत विजेच्या लपंडावामुळे पंखे, कुलर बंद राहत असल्याने नागरिकांचा घाम निघत आहे. त्यामुळे महावितरण्च्या कारभाराविरुद्ध नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT