छत्रपती संभाजीनगर

जरांगे यांची मागणी

CD
पाचशे कोटी प्रकरणातील सत्य शोधा --- मनोज जरांगे ः निःपक्ष तपासाची जबाबदारी सरकारची --- अंकुशनगर (जि. जालना), ता. २३ ( बातमीदार) ः ‘‘मराठा आंदोलनाला बदनाम करण्यासाठी किंवा आंदोलन चिरडण्यासाठी कथितरीत्या पैसे पुरवले जात असल्याचा आरोप होत असेल, तर त्याचा सखोल तपास करून सत्य जनतेसमोर आणले पाहिजे. कथित पाचशे कोटी रुपयांच्या व्यवहारामागील सत्य शोधून काढण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावी’’, अशी भूमिका मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी शुक्रवारी (ता. २३) येथे माध्यमांशी बोलताना मांडली. ‘‘या प्रकरणात शिवसेना नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव येत असेल, तर त्यांनी पैसे घेतले आहेत का, याचीही निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. त्यांनी पैसे घेतले नसतील, तर त्यांची विनाकारण बदनामी होता कामा नये’’, असे ते म्हणाले. बीड जिल्ह्यातील नारायणगडावरील दसरा मेळाव्यात जरांगे यांनी शिंदे यांच्यावर पाचशे कोटींसंदर्भातील आरोप केल्यानंतर काल त्यांनी पुरावा म्हणून कथित ऑडिओ क्लिप ऐकवली होती. त्यावर राजकीय गोटात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. जरांगे म्हणाले, मी जाहीर केलेल्या कथित रेकॉर्डिंगची सत्यता पडताळून वास्तव उघड करावे. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्राचा (एआय) आधार घेऊन रेकॉर्डिंग खोटे असल्याचे किंवा अन्य कारणे सांगून जबाबदारी टाळू नये. सरकारकडे तपासासाठी सर्व यंत्रणा उपलब्ध आहेत. त्यामुळे तांत्रिक तपास करून सत्य काय आहे, हे स्पष्ट करावे.’’ ‘एसआयटी’ चौकशी करा -- ‘‘या प्रकरणाचे धागेदोरे मुंबई, महाराष्ट्रातील काही अन्य ठिकाणी आणि दिल्लीपर्यंत पोचत असल्याचा संशय व्यक्त होत असल्याने तपासात अडथळे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सक्षम अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (एसआयटी) नेमावे, या पथकाला कोणत्याही राजकीय दबावाशिवाय काम करण्याचे स्वातंत्र्य मिळावे. मात्र, कोणताही द्वेष न ठेवता निःपक्ष चौकशी व्हावी. तपासासाठी सरकारला आवश्यक ती मदत, सहकार्य करण्यास आम्ही तयार आहोत. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे हे किती खोलात जाऊन तपास करतात, याकडे आमचे लक्ष असेल’’, असे त्यांनी सांगितले. सर्वपक्षीय नेत्यांनी सावध राहावे -- या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांतील राजकीय नेते, विशेषतः मराठा समाजातील नेते, सामाजिक कार्य करणारे, ओबीसी नेत्यांसह सामान्य नागरिकांनीही जागरूक राहिले पाहिजे, असे मत जरांगे यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI Junior Selection Committee: भारताच्या माजी वेगवान गोलंदाजाकडे मोठी जबाबदारी! परविंदर अवाना बनले BCCI ज्युनियर निवड समितीचे अध्यक्ष

Kojagiri Purnima 2026: यंदा कधी आहे कोजागिरी पौर्णिमेचा मुहूर्त? जाणून घ्या पूजा विधी आणि पौराणिक कथा

Marathi News Live Updates: FDA चा औषध विक्रेत्यांना दणका; राज्यात २९ परवाने रद्द, ७१ निलंबित

IND W vs ZIM W: श्री चरणीची भेदक गोलंदाजी; झिम्बाब्वेचा डाव आटोपला, भारतासमोर किती धावांचं लक्ष्य?

Baramati News : निवडणूक पदवीधरची....बारामतीचे राजकारण ढवळून निघाले...

SCROLL FOR NEXT