2coronavirus_63 
छत्रपती संभाजीनगर

माझे कुटुंब, माझी जबाबदारी उपक्रमाअंतर्गत तब्बल १४ लाख व्यक्तींचे सर्वेक्षण पूर्ण!

दुर्गादास रणनवरे

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्रशासनाच्या आरोग्य विभागातर्फे माझे कुटुंब, माझी जबाबदारी या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील विविध गावांतील तब्बल १४ लाख २२ हजार ७१७ व्यक्तींचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. ३ लाख ३२ हजार ३३६ कुटुंबांतील सदस्यांची आरोग्य तपासणी करण्यात आल्याचा दावा आरोग्य विभागातर्फे गुरुवारी (ता.२४) करण्यात आला आहे. तर या सर्वेक्षणादरम्यान १६ हजार ७३५ व्यक्तींना कोरोनासदृश आजाराची लक्षणे आढळून आल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.


जिल्हा परिषदेतर्फे जिल्ह्यातील माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेवर भर देण्यात येत असून घरोघरी जाऊन आरोग्य विभागाचे पथक कुटुंबातील सर्व सदस्यांची तपासणी करीत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ, तसेच डॉ. विजयकुमार वाघ आणि आरोग्य विभागाची टीम या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी पुढाकार घेत आहे.

सोळा हजारांना कोरोनासदृश लक्षणे
माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत सुरू असलेल्या तपासणीदरम्यान ज्या व्यक्तींना कोरोनासदृश आजाराची लक्षणे आढळून आली अशांची स्वतंत्र नोंद घेतली जात आहे. त्यानुसार जिल्ह्यात १६ हजार ७३५ व्यक्तींमध्ये कोरोनासदृश आजाराची लक्षणे आढळून आल्याचेही आरोग्य विभागातील अधिकृत सूत्रांनी सांगितले.


रुग्णसंख्या बारा हजारांवर
जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी (ता. २४) कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या आता १२ हजार ५४ वर येऊन ठेपली आहे. यापैकी ९ हजार ८५५ रुग्ण बरे झाले असून, त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर २४० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सद्यःस्थितीत १ हजार ९५९ रुग्ण उपचार घेत असल्याचेही आरोग्य विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT