छत्रपती संभाजीनगर

गोशाळेतील पशुंच्या चाऱ्यासाठी गोशाळा महासंघ आक्रमक ------------------ दुष्काळ परिस्थितीत गोशाळेतील पशुंना प्रति दिवस प्रति पशुंना शंभर रुपये चारा अनुदान द्या

CD
प्रति दिन १०० रुपये चारा अनुदानाची मागणी गेवराई, ता. ३ (बातमीदार) ः राज्यात शासनाने दुष्काळ जाहीर केला असून, चाऱ्याअभावी पशुधनाची मोठी दुरवस्था झाली आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र शासनाकडे नोंदणीकृत असलेल्या १०१४ गोशाळांमधील प्रत्येक पशूला चारा आणि पाण्यासाठी प्रति दिन १०० रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी गोशाळा महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे. जिल्ह्यातील गोशाळा संचालक आणि पशुपालकांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नुकतेच याबाबतचे निवेदन दिले आहे. पाऊस कमी झाल्यामुळे शेतात कडबा, कुटार किंवा डोंगर-जंगलातही चारा उपलब्ध नाही. चाऱ्याचे दर गगनाला भिडले असून, शासनाकडेही पुरेसा चारा साठा उपलब्ध नसल्याने भविष्यात मोठी समस्या निर्माण होऊ शकते. पाण्याची पातळी खालावल्याने गोशाळांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ येऊ शकते. दुष्काळामुळे शेतकरी आपले पशुधन गोशाळांमध्ये सोडत असल्याने, गोशाळांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक गोवंश जमा झाला आहे. स्वतःचे पोट भरणे कठीण झाल्याने काही शेतकरी नाइलाजाने जनावरे कत्तलखान्याकडे पाठवत आहेत, हे वास्तव अत्यंत विदारक असल्याचे निवेदनात म्हटले आहे. ---- प्रमुख मागण्या या भीषण परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी शासनाने ग्रामपंचायत स्तरावर चारा डेपो सुरू करावेत, तसेच गोशाळांमधील पशुधनासाठी तातडीने प्रति दिन प्रति पशू १०० रुपये अनुदान जाहीर करावे, अशी आग्रही मागणी गोशाळा महासंघाने केली आहे. शासनाने वेळीच पावले न उचलल्यास पशुधनाचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आंदोलन करा, पण ठरावीक वेळेतच! सुप्रीम कोर्टानं स्पष्टच सांगितलं; काय म्हणाले CJI सूर्यकांत?

High Court: भारत धर्मनिरपेक्ष! दिया मिर्झाचा डिलीट केलेला व्हिडीओ पुन्हा शेअर करा; हायकोर्टानं भाजपला फटकारलं

Pune Bangalore Highway Traffic : राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली किणी टोलनाक्यावर चक्का जाम, पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक विस्कळीत

'आमच्या लाडक्या नाईकबाई' मालिका बंद होणार? सोशल मीडियावर रंगली चर्चा

Latest Marathi News Live Update : पुण्यातील वाहतूक कोंडी 4 वर्षांत कमी होणार, देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT