आरोग्य विभागातील रिक्त पदे
तातडीने भरा ः श्रीजया चव्हाण
---
नांदेड, ता. ५ : शासकीय रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. आरोग्य विभागातील सर्व रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी भोकरच्या आमदार श्रीजया चव्हाण यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे केली. आरोग्यमंत्र्यांच्या राज्यव्यापी आरोग्य संवाद यात्रेनिमित्त नांदेड दौऱ्यात आयोजित ऑनलाइन बैठकीत माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण आणि आमदार श्रीजया चव्हाण सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी आरोग्यविषयक समस्या मांडल्या. भोकर, मुदखेड व अर्धापूर तालुक्यांतील रुग्णांसाठी सोनोग्राफी सुविधा उपलब्ध करावी, डायलिसिस केंद्रांना नियमित पाणीपुरवठा करावा, रुग्णालयांच्या स्वच्छतेसाठी कंत्राटदार नियुक्त करावेत, जैववैद्यकीय कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी इन्सिनरेटर उपलब्ध करावा आणि येळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला निधी मंजूर करावा, अशी मागणी श्रीजया चव्हाण यांनी केली. खासदार अशोक चव्हाण यांनी विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला सुपर स्पेशालिटी दर्जा देण्याच्या प्रस्तावाचा पाठपुरावा करण्याची मागणी केली. तसेच भोकर उपजिल्हा रुग्णालयाचे प्रलंबित काम पूर्ण करणे आणि शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याची मागणीही त्यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.