Sambhaji Nagar sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar : वक्फ बोर्डातील पद आठ दिवसांत भरणार ; खंडपीठात शासनाकडून तोंडी हमी

वक्फ न्यायाधिकरण व वक्फ बोर्डातील रिक्त पद भरतीसंदर्भात खंडपीठात जनहित याचिका दाखल आहे. वक्फ न्यायाधिकरणावर एक सदस्य अतिरिक्त जिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी नियुक्तीसंदर्भात खंडपीठाने यापूर्वीच्या आदेशात स्पष्ट केले असतानाही सोमवारच्या सुनावणीत शासनातर्फे दिवाणी अर्ज दाखल करून चार आठवडे मुदतीची विनंती करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर: वक्फ न्यायाधिकरण व वक्फ बोर्डातील रिक्त पद भरतीसंदर्भात खंडपीठात जनहित याचिका दाखल आहे. वक्फ न्यायाधिकरणावर एक सदस्य अतिरिक्त जिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी नियुक्तीसंदर्भात खंडपीठाने यापूर्वीच्या आदेशात स्पष्ट केले असतानाही सोमवारच्या सुनावणीत शासनातर्फे दिवाणी अर्ज दाखल करून चार आठवडे मुदतीची विनंती करण्यात आली. मात्र, नंतर आठ दिवसांत नियुक्ती करण्याची तोंडी हमी देण्यात आली. याचिकेवर मंगळवारीही सुनावणी सुरू राहील.

खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. वाय. जी. खोब्रागडे यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत अल्पसंख्याक विभागाच्या प्रधान सचिवांना खंडपीठाने दिलेल्या आदेशांचे पालन करून ६० दिवसांत सर्व रिक्तपदे न भरल्याबाबत खुलासा करण्याचे आदेशही दिले होते.

त्यावर खुलाशात शासनातर्फे स्पष्ट करण्यात आले, की न्यायाधिकरणात ११ पदे नियमित आणि ५ पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात आली असून केवळ ६ नियुक्त्या बाकी आहेत. याचिकाकर्त्यांतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ राजेंद्र देशमुख यांनी सांगितले, की माहिती अधिकारातील माहितीनुसार वक्फ बोर्डवरील तिसऱ्या सदस्यांची नियुक्तीसंदर्भात सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

ही फाइल मुख्यमंत्र्यांसमोर जानेवारी २०२३ पासून प्रलंबित आहे. वक्फ बोर्डवरील नियुक्त्या या कोविड तसेच मराठा आंदोलनामुळे रेंगाळल्या आहेत. दरम्यान, हस्तक्षेपक गुलाम खालिक यांच्यातर्फे ॲड. कृष्ण रोडगे तर राज्य शासनातर्फे ॲड. अमरजितसिंग गिरासे यांनी काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT