gevrai gevrai
छत्रपती संभाजीनगर

कौतुकास्पद! वृद्ध दाम्पत्याने बैलगाडीत जाऊन घेतली कोरोनाची लस

गेवराई तालुक्यात जवळपास चाळीस नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे

भास्कर सोळंके

जातेगाव (जि बीड): सुर्डी बूद्रूक (ता गेवराई) येथील एका वृध्द दाम्पत्यांनी गुरुवार (ता 3) जातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात बैलगाडीने जाऊन कोरोनाची लस (covid 19 vaccination) टोचून घेतली आहे.कोरोनाचा प्रसार मागील वर्षापासून वाढत होता. गेल्या वर्षी कोरोनाचा प्रभाव जास्त शहरांत दिसून आला होता पण या लाटेत ग्रामीण भागासह गावखेड्यांत फैलाव मोठा असल्याचे दिसत आहे.

गेवराई तालुक्यात जवळपास चाळीस नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोना साथ आटोक्यात यावी यासाठी केंद्र आणि राज्य शासनाककडून लॉकडाऊन 15 जूनपर्यंत वाढविले आहे. दरम्यान, या लॉकडाऊन काळात 45 वर्षापुढील नागरिकांसाठी लसीकरण उपजिल्हा रुग्णालयात तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू असताना वृद्ध दाम्पत्यांना लसीकरण करुन घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मात्र सुर्डी बूद्रूक येथील बळीराम तवले आणि त्यांच्या पत्नी यांनी गुरुवारी बैलगाडीने सुर्डी ते जातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र असा प्रवास करत या वृद्ध दाम्पत्यांनी कोविड लसीचा पहिला डोस टोचून घेतला. कोरोना साथ असल्याने या दाम्पत्यांनी ना रिक्षा, ना दूचाकीवर जाता बैलगाडीने जाऊन लसीकरण करुन घेतले. याबद्दल डॉ. प्रकाश फड व आरोग्य कर्मचारी यांनी तवले दाम्पत्यांचे कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अभिजीत दीपकेंना विचारलं- देशाचा बेस्ट PM कोण? क्षणाचाही विलंब न करता घेतलं 'या' नेत्याचं नाव; बेस्ट CM साठी घेतली तीन नावं

Bidkin News: बिडकीनच्या DMIC हद्दीत अज्ञात महिलेचा संशयास्पद मृतदेह; घातपाताचा संशय, पोलिस तपास सुरू

CNG-PNG महागणार? शेणापासून तयार होणाऱ्या CBG ची किंमत वाढली; ग्राहकांच्या खिशावर कसा परिणाम होणार?

Amravati Hospital Fire : निधी नव्हता म्हणून फायर ऑडिटला विलंब, अमरावतीतील रुग्णालयाबाबत धक्कादायक माहिती समोर

Pune Court: न्यायसेवेतील प्रदीर्घ अनुभव पुण्याच्या न्यायालयाच्या कामी; अंजू शेंडे यांनी स्वीकारला प्रमुख न्यायाधीशपदाचा पदभार

SCROLL FOR NEXT