Chhatrapati Sambhajinagar sakal
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar : सात कोटींचा ऑक्सिजन प्रकल्प धूळखात

वैजापूर : दोन वर्षांपासून बंद; शंभर रुग्णांची होऊ शकते सोय

सकाळ वृत्तसेवा

वैजापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या ऑक्सिजन टंचाईच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयांत कायमस्वरूपी ऑक्सिजनची व्यवस्था करण्यासाठी तब्बल ७ कोटी रुपये खर्च करून ऑक्सिजन प्रकल्प निर्मिती करण्यात आली. मात्र, दोन वर्ष उलटूनही हा प्रकल्प सुरु करण्यात आरोग्य विभागाला वेळ न मिळाल्याने करोडो रुपयांचा हा प्रकल्प धूळखात पडून आहे. यामुळे रुग्णांनी आरोग्य विभागाच्या बेजबाबदार कारभाराविरुद्ध रोष व्यक्त केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कोरोनाच्या महामारीनंतर शासनाने तालुक्यातील प्रत्येक शासकीय रुग्णालयांत कायमस्वरूपी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारले. या पार्श्वभूमीवर वैजापूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयातही तब्बल ७ कोटी खर्च करून १० के.एल. क्षमतेचा प्रकल्प उभारण्यात आला. यासाठी आवश्यक त्या परवानग्या व ना हरकत या सर्वबाबी पूर्ण करण्यात आल्या. परंतु कोरोनाचा जोर ओसरल्याने या ऑक्सिजन टाकीमध्ये कुणीच लिक्विड ऑक्सिजनच भरून चाचणी केली नाही. त्यामुळे दोन वर्षांपासून हा प्रकल्प धूळखात पडल्याने यंत्र गंजत आहे.

वैजापूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्रकल्प तत्काळ पूर्ण व्हावा यासाठी अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. याबाबत आवश्यक असणाऱ्या सर्व मंजुरी घेणे, प्रकल्पाचा सेटअप उभा करणे. याबाबत पाठपुरावा सुरू होता.

येथील लोक प्रतिनिधी वेळोवेळी प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवून योग्य त्या सूचना देऊन हा प्रकल्प उभा केला. त्यामुळे तालुक्यातील १०० रुग्णांना एकाचवेळी यातून पुरेसा ऑक्सिजन मिळू शकतो. परंतु सध्या हा प्रकल्प धूळखात पडला आहे. दरम्यान, हा प्रकल्प सुरु झाल्यावर वैजापूर तालुक्यातील रुग्णांवर सहज उपचार करता येतील व सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.

ऑक्सिजन प्रकल्प उभा केल्यानंतर त्यामध्ये लिक्विड ऑक्सिजन भरण्यात कोणी आलेच नाही. त्यामुळे हा प्रकल्प बंद आहे. या प्रकल्पाद्वारे १०० रुग्णांना ऑक्सिजन पुरविला जाऊ शकतो. हा प्रकल्प सुरु झाल्यास रुग्णालयात अजून नवीन खाटांची संख्या वाढू शकते.

-डॉ. सुधाकर मुंढे (वैद्यकीय अधीक्षक)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI : संजू सॅमसनची अविस्मरणीय खेळी... वंदे मातरम्... सूर्यकुमार यादवचा कुर्निसात... अंगावर शहारा आणणारा Video

T20 WC, IND vs WI : संजू सॅमसनची ९७ धावांची मॅच विनिंग खेळी! भारत ऐतिहासिक विजयासह उपांत्य फेरीत; आता इंग्लंडला भिडणार

Sanju Samson Reaction : देवाची कृपा! संजू सॅमसन भावनिक झाला; सेलिब्रेशन, देवाचे आभार अन् म्हणाला, विराट, रोहित यांनी...

BMC Property Tax: मुंबईकरांना दिलासा!मालमत्ता करात मोठा बदल; ७०० स्क्वेअर फूट घरांना फायदा, बीएमसीचा महत्त्वाचा निर्णय

Paithan Crime: अपहृत विद्यार्थिनीची सुटका, शिक्षकास बेड्या; पैठण पोलिसांची मुंबईत कारवाई, लोकेशन बदलून देत होता हुलकावणी!

SCROLL FOR NEXT