छत्रपती संभाजीनगर

पं.स. सभागृहातील आमदारांच्या बैठकीवरून ''स्थायी''त खडाजंगी

CD
वैजापुरातील आमदारांच्या बैठकीवरून ‘स्थायी’त खडाजंगी एकाच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रण; जि.प. व पं.स. सदस्यांना डावलल्याचा आरोप. छत्रपती संभाजीनगर, ता. १४ : शिवसेनेचे वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांनी पंचायत समितीच्या सभागृहात घेतलेल्या आढावा बैठकीवरून जिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत भाजपसह उबाठाच्या सदस्यांनी तीव्र आक्षेप नोंदविला. बैठकीसाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व सदस्यांना निमंत्रित न करता एका पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनाच बोलावल्याचा आरोप सदस्यांनी केला. आमदारांना तालुक्यात आढावा बैठक घेण्यास आक्षेप नाही. मात्र, ती बैठक लोकहिताची असल्यास सर्व लोकप्रतिनिधींना सहभागी करून घेणे आवश्यक आहे, अशी भूमिका सदस्यांनी मांडली. पंचायत समिती सभागृहात बैठक घेण्यात आली असताना त्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांना संबंधित गटविकास अधिकाऱ्यांकडून देण्यात आली नाही. तसेच सभागृहात ‘आमदारांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक’ असा फलक लावल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी हे सभागृहाचे सचिव असल्याने बैठकीच्या आयोजनातील प्रोटोकॉलची जबाबदारी त्यांची असल्याचे उबाठाचे संजय निकम, भाजपचे रतन बत्तीसे यांनी सांगितले. याप्रकरणी प्रशासनाने वैजापूरच्या प्रभारी गटविकास अधिकाऱ्यांना नोटीस देऊन आठ दिवसांत खुलासा मागवावा. अध्यक्षांसह मुख्य कार्यकारी अधिकारी व पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तो सादर करावा, असे आदेश जि.प. अध्यक्ष अविनाश गलांडे यांनी दिले. --- प्रोटोकॉलनुसार सदस्यांना सन्मान देणे आवश्यक ः गलांडे जिल्हा परिषदेमार्फत होणाऱ्या विकासकामांच्या उद्‍घाटनांनाही संबंधित जिल्हा परिषद सदस्यांना डावलले जात असल्याचा आरोप सदस्यांनी केला. आम्ही विरोधी पक्षाचे असलो तरी हजारो मतदारांतून निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहोत. त्यामुळे पक्षीय राजकारण न करता प्रोटोकॉलनुसार सर्व सदस्यांना सन्मान देणे आवश्यक असल्याचेही अध्यक्ष गलांडे यांनी अधिकाऱ्यांना बजावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nirgudsar Theft : बंद घरावर चोरट्यांचा डल्ला; २८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि १५ हजार रुपये रोख रक्कम नेली चोरून

TMC rebels join BJP: 'तृणमूल'चे १७ बंडखोर खासदार भाजपच्या वाटेवर? NCPI नेत्याचं धक्कादायक विधान

Marathi News Live Updates : पुण्यात पाच मानाच्या गणपतीसह प्रमुख गणपती मंडळांची प्राणप्रतिष्ठा

रेल्वेत कुटुंबियांसोबत बसण्यासाठी सीट बदलता येते का? जाणून घ्या रेल्वेचा नियम...

LONG LIFE HOROSCOPE: या’ 6 राशींच्या लोकांना मिळतं दीर्घायुष्याचं वरदान? 100 वर्षांनंतरही राहतात निरोगी, ज्योतिषशास्त्रात काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT