छत्रपती संभाजीनगर

वैजापूरजवळ महिलेवर अत्याचार ; संशयित ऑटोचालक पोलिसांच्या ताब्यात

CD
प्रवासी महिलेवर अत्याचार; रिक्षाचालक जालन्यातून अटक वैजापूर, ता. २९ (बातमीदार) : घरगुती वादातून घराबाहेर पडलेल्या महिलेला घरी सोडण्याच्या बहाण्याने निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना २७ ऑक्टोबरला जांबरगाव शिवारात घडली. याप्रकरणी वैजापूर पोलिसांनी बुधवारी (ता. २८) रिक्षाचालक नारायण एकनाथ हरकल (वय २९, रा. जीवनगंगा हाउसिंग सोसायटी, वैजापूर) याला जालन्यातून शिताफीने अटक केली. पीडित महिला २६ ऑक्टोबरच्या सायंकाळी जोगेश्वरी येथील घरातून वादातून बाहेर पडली होती. ती कायगाव येथे थांबली असताना रात्री अकराच्या सुमारास रिक्षाचालक हरकल याने विचारपूस करून तिला घरी सोडण्याचे आश्वासन दिले. मात्र, त्याने शॉर्टकटचा बहाणा करत रिक्षा जांबरगावच्या निर्जन रस्त्याकडे वळवली. पहाटे तीनच्या सुमारास चालकाने रिक्षा थांबवून महिलेस ठार मारण्याची धमकी देत अत्याचार केला. तसेच दागिने हिसकावण्याचा प्रयत्न केला असता, तिने त्याचा हात झटकून पळ काढला. मुख्य रस्त्यावरील चहाच्या टपरीवर पोचून महिलेने नागरिकांच्या मदतीने पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला. पोलिस उपअधीक्षक विनय सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शोध घेत आरोपी नारायण हरकल याला बुधवारी दुपारी जालन्यातून बेड्या ठोकल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Chairman Election : 'गोकुळ'च्या अध्यक्षपदी चुयेकर, समांतर सभेत मोठी घोषणा; सतेज पाटलांचा मास्टरस्ट्रोक, आता महायुतीच्या भूमिकेकडे लक्ष

SIP Investment: फक्त 3,500 रुपयांच्या SIP मधून 3 कोटींचा फंड! करोडपती बनण्याचा फॉर्म्युला कसा काम करतो? गणित पाहा!

School Books: सरकार बदललं अन् शालेय पाठ्यपुस्तकातील 'हे' शब्दही बदलले; पश्चिम बंगालमध्ये मुघल इतिहासाला कात्री

Meenakshi Shinde Resign: माझ्या मनाला प्रचंड वेदना होतायत..., मीनाक्षी शिंदेंनी राजीनाम्याच्या पत्रात नेमकं काय लिहलंय?

WPL AUCTION 2027: वय फक्त १५ वर्षे, WPL ऑक्शनमध्ये इतिहास! दिल्ली कॅपिटल्सने उमा काशवीला निवडलं, कोण आहे ही युवा अष्टपैलू खेळाडू?

SCROLL FOR NEXT