छत्रपती संभाजीनगर

वामननगरात घरफोडी; सव्वा लाखांचा ऐवज लंपास

CD
वामननगरात घरफोडी; सव्वा लाखांचा ऐवज लंपास नांदेड : शहरातील वामननगर परिसरात बंद घराचे कुलूप आणि कोयंडा तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण एक लाख २३ हजार २०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना ६ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन ते १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.१५ या कालावधीत घडली. याप्रकरणी अमोल अनंतराव हाळे (वय ३७, रा. वामननगर, नांदेड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भाग्यनगर पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जहागिरदार करीत आहेत. ----- धर्माबादमध्ये २९ हजारांचा गुटखा जप्त नांदेड : धर्माबाद शहरातील फुलेनगर परिसरात अवैध विक्रीसाठी साठवून ठेवलेला २९ हजार २३४ रुपयांचा गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखू पोलिसांनी जप्त केली. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. शेख अफसर शेख दाऊद पटेल (वय २८) आणि शेख अन्सार शेख दाऊद पटेल (दोघे रा. फुलेनगर, धर्माबाद) हे १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.२५ वाजेच्या सुमारास विनापरवाना विविध कंपन्यांचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ विक्रीच्या उद्देशाने बाळगून असल्याचे आढळले. याप्रकरणी पोलिस कर्मचारी विठ्ठल सुपारे यांच्या फिर्यादीवरून धर्माबाद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. अन्नसुरक्षा व मानके अधिनियमासह भारतीय न्याय संहितेतील विविध कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक ठेंगे करीत आहेत. ---- जुगारावर छापा; नऊ जणांवर गुन्हा नोंद नांदेड : शहरातील जवाहरनगर परिसरातील शेतशिवारात सुरू असलेल्या तिर्रट जुगार अड्ड्यावर नांदेड ग्रामीण पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत नऊ जणांना पकडण्यात आले असून, दोन मोबाइल, रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ३७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. साईनाथ बालाजी कोल्हे (वय २८, रा. भायगाव) याच्यासह अन्य आठ जण विनापरवाना तिर्रट नावाचा जुगार खेळत आणि खेळवत असल्याचे आढळले. पोलिस कर्मचारी शंकर माळगे यांच्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२ (अ) अन्वये गुन्हा नोंद केला आहे. तपास पोलिस हवालदार पचलिंग करीत आहेत. ---- माळकौठ्यात गावठी दारूचा साठा जप्त नांदेड : मुदखेड तालुक्यातील माळकौठा येथे विनापरवाना विक्रीसाठी साठवून ठेवलेली १३ हजार २०० रुपयांची गावठी हातभट्टीची दारू पोलिसांनी जप्त केली. याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्ता माणिका गोनेवाड (वय ४०, रा. माळकौठा, ता. मुदखेड) हा १५ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास गावठी हातभट्टीची दारू चोरट्या पद्धतीने विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगून असल्याचे आढळले. पोलिस हवालदार दिलीप चक्रधर यांच्या फिर्यादीवरून मुदखेड पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार सुनकुंवर करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महागमार्ग धाराशिवमध्ये रोखला! सोलापूरमध्ये राजू शेट्टींची जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक; आता मोर्चा बारामतीकडे...

Syed Mushtaq Ali Trophy: सूर्यकुमारचं वादळ पुन्हा घोंगावलं! ९ चौकार अन् ७ षटकारांसह अर्धशतक करत मुंबईला मिळून दिला मोठा विजय

Latest Marathi News Update : चंद्रपूर जिल्ह्यात बसला भूकंपाचा सौम्य धक्का; ३.२ रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद, कुरली गावाजवळ होता केंद्रबिंदू

Supreme Court: सुनावणीपूर्वी इंडिया आघाडीची आक्रमक खेळी; मुख्य निवडणूक आयुक्तांना 48 प्रश्न विचारण्याची मागितली परवानगी

Spine Surgery: जन्माची वाट न पाहता आईच्या गर्भातच बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया; AIIMSच्या डॉक्टरांनी रचला इतिहास

SCROLL FOR NEXT