फोटो ः कृषी विद्यापीठाचा लोगो
--------
करडई ब्रीडर बियाणे वाटपात ‘वनामकृवि’चा दबदबा
------
-देशातील ५२.३८ टक्के ब्रीडर बियाणे विद्यापीठाच्या वाणांचे
सकाळ वृत्तसेवा
परभणी, ता. ११ ः रब्बी २०२६-२७ हंगामासाठी देशभरातील करडई पिकाचे ब्रीडर बियाणे वाटपात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी नोंदविली आहे. देशभरात करडईसाठी वाटप करण्यात आलेल्या एकूण १६१.३३ क्विंटल ब्रीडर बियाण्यांपैकी ८४.५ क्विंटल, म्हणजेच ५२.३८ टक्के बियाणे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या वाणांचे आहे.
केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या तेलबिया विभागामार्फत रब्बी हंगामासाठी करडईसह विविध तेलबिया पिकांच्या ब्रीडर बियाणे वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. या वाटपातून ‘वनामकृवि’च्या करडई संशोधनाची राष्ट्रीय स्तरावरील गुणवत्ता आणि स्वीकारार्हता अधोरेखित झाली आहे. विद्यापीठाच्या वाणांमध्ये पीबीएनएस १५४ (परभणी सुवर्णा) या २०२३ मध्ये अधिसूचित वाणाला सर्वाधिक ४८ क्विंटल ब्रीडर बियाणे वाटप झाले आहे. २०२२ मध्ये अधिसूचित पीबीएनएस १८४ वाणासाठी २८.५ क्विंटल, तर २००७ मध्ये अधिसूचित पीबीएनएस-१२ (परभणी कुसुम) वाणासाठी ८ क्विंटल बियाणे देण्यात आले आहे. कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांच्या नेतृत्वाखाली आणि संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाने गुणवत्तापूर्ण संशोधन व बियाणे उत्पादनाला प्राधान्य दिले आहे.
((चौकट)))
कुलगुरूंनी केले अभिनंदन
या कामगिरीबद्दल कुलगुरूंनी करडई संशोधन केंद्रातील अधिकारी, शास्त्रज्ञ व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. या वाणांच्या विकासात माजी संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, डॉ. दत्तप्रसाद वासकर, करडई पैदासकार डॉ. आर. आर. धुतमल, माजी पैदासकार डॉ. एस. बी. घुगे तसेच अखिल भारतीय समन्वित करडई प्रकल्पातील वैज्ञानिक व तांत्रिक कर्मचाऱ्यांचे योगदान आहे.
-----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.