Chandrakant Khaire  Team eSakal
छत्रपती संभाजीनगर

न्यायालयात जाणार, चंद्रकांत खैरेंनी तयार राहावे; वंचित बहुजन आघाडीचा इशारा

चंद्रकांत खैरेंनी तयार राहावे !

सकाळ डिजिटल टीम

वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमने लोकसभा निवडणुकीत भाजपकडून एक हजार कोटी रुपये घेतल्याचा आरोप शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी केला. या आरोपाचा वंचितने समाचार घेतला आहे. खोटे आरोप करणाऱ्यांच्या विरोधात वंचित आघाडी न्यायालयात जाणार आहे. त्यामुळे खैरे यांनी तयार राहावे, असा इशार वंचितचे प्रदेश प्रवक्ते फारुख अहमद यांनी दिला आहे. बोलण्याचे स्वातंत्र्य असले तरी त्यांनी इतरांवर आरोप करताना विचारपूर्वक बोलावे, असा सल्ला त्यांनी खैरे यांना दिला. (Vanchit Bahujan Aghadi Will Go Against Chandrakant Khaire In Court)

खैरेंकडे पैसे दिल्याचा पुरावा असल्यास तो द्यावा. मुख्यमंत्री त्यांचे असून सर्व तपास यंत्रणा त्यांच्याच हातात आहे. त्यामुळे असे बिनबुडाचे आरोप खैरे करत असल्याचा टोला फारुख अहमद यांनी लगावला. यापूर्वी शिवसेनेच्या नेत्याने आरोप केले होते. त्यानंतर त्याला माफी मागावी लागली असे ते म्हणाले. वंचित आघाडीचे चारित्र्य स्वच्छ असून खोटे व निराधार आरोप करणाऱ्यांविरोधात वंचित आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) न्यायालयात गेल्याशिवाय राहणार नाही. पुराव्याशिवाय आरोप करणाऱ्यांनी मानहानीच्या दाव्यासाठी तयार राहावे, असा इशार त्यांनी दिला.

खैरे काय म्हणाले होते?

वंचित आणि एमआयएमने लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून एक हजार कोटी रुपये घेतल्याचा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला. नुकतीच उत्तर प्रदेशची निवडणूक झाली. तेथे समाजवादी पक्षाचे लोक फोडण्यासाठी कशाला पैसे दिले, असा सवाल त्यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार? विखे पाटलांनी दिली मोठी माहिती

Car Accident : समृद्धी महामार्गावर भरधाव कारची अज्ञात वाहनाला धडक; एक ठार, दोघे गंभीर

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Ketu Transit Lucky Zodiac Signs: ‘या’ ६ राशींच्या नशिबात येणार मोठा ट्विस्ट; केतूच्या गोचराने मिळणार धनलाभाची संधी, पाहा तुमची रास आहे का?

Marathi News Live Updates: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT