छत्रपती संभाजीनगर

आरोग्य व्यवस्था सलाईनवर!

CD
((लीड))) ---- ABD26J78890 वानोळा : अनेकदा तालुका अधिकाऱ्यांची खूर्ची अशी रिकामीच दिसून येते. --- वानोळ्यातील आरोग्य व्यवस्था सलाइनवर! ----- माहूरमध्ये नागरिकांचा संताप, चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी --- गोपाल नाईक वानोळा, ता. ८ : माहूर तालुका आरोग्य कार्यालयातील तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेश माचेवार यांच्या कार्यालयीन उपस्थितीबाबत नागरिकांकडून सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अधिकारी कार्यालयात उपलब्ध नसल्याने नागरिकांना आपल्या आरोग्यविषयक समस्या मांडण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी आहेत. माहूर हा बंजारा व आदिवासीबहुल तालुका असून, ग्रामीण तसेच दुर्गम भागातील नागरिक मोठ्या प्रमाणावर शासकीय आरोग्य व्यवस्थेवर अवलंबून आहेत. त्यामुळे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची कार्यालयातील उपस्थिती आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांतील कारभाराबाबत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. वानोळा प्राथमिक आरोग्य केंद्रासह तालुक्यातील विविध आरोग्य केंद्रांमध्ये औषधसाठा, कर्मचारी उपस्थिती आणि नागरिकांना मिळणाऱ्या आरोग्य सेवांबाबतही नागरिकांच्या तक्रारी आहेत. तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात नेमके कधी आणि किती वेळ उपलब्ध असतात, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या प्रकरणाची वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेऊन प्रत्यक्ष पाहणी करावी आणि तक्रारींची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी होत आहे. दोष आढळल्यास नियमानुसार कारवाई करून तालुक्याला कर्तव्यदक्ष आरोग्य अधिकारी द्यावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. --- ((कोट)) माहूर तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेबाबत नागरिकांच्या तक्रारी गंभीर आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून गैरहजर अधिकारी-कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी आणि गोरगरीब नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळतील, याची काळजी घ्यावी. -नितीन राठोड, नागरिक. --- (((कोट)) गैरहजर कर्मचारी आढळल्यास त्यांना नोटीस देण्यात येईल. संबंधित कर्मचाऱ्यांच्या बायोमेट्रिक हजेरीची तपासणी केली जाईल. गैरहजेरी अथवा अनियमितता आढळल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल. -डॉ. संतोष नवले, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: DJ बंदीच्या मागणीवर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकार विद्यानंद बापट यांच्यासोबत...

IND vs WI : श्रेयस अय्यर वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे मालिकेतून OUT! नेमकं काय कारण अन् कोण असतील भारताचे १५ शिलेदार?

Sainik Takli MIDC controversy : आमदार यड्रावकरांनीच सैनिक टाकळी एमआयडीसीचा घाट घातला? शिरोळ तहसील कार्यालयात आंदोलकांचे गंभीर आरोप; संभाजी भिडेंनी केलं नेतृत्व

Safe Investment: 2,000 रुपायांची छोटी बचत बनवेल 1.42 लाखांचा फंड! पोस्ट ऑफिसची ही योजना पाहिली का?

Shani Sade Sati 2026 : शनीची साडेसाती बिघडवणार गेम! 2026 मध्ये 'या' 3 राशींवर राहणार शनीची नजर; वाचा तुमचा टप्पा कोणता?

SCROLL FOR NEXT