छत्रपती संभाजीनगर

वानोळ्यातील १०२ रुग्णवाहिका बंद; शासकीय डॉक्टरांच्या उपस्थितीवरही प्रश्नचिन्ह!

CD
वानोळ्यातील १०२ रुग्णवाहिका बंद --- रुग्णांची आरोग्यसेवा वाऱ्यावर; वरिष्ठांकडे चौकशीची मागणी ----- वानोळा, ता. ४ (बातमीदार) : माहूर तालुक्यातील वानोळा येथील १०२ क्रमांकाची रुग्णवाहिका बंद अवस्थेत असल्याने आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वेळेवर रुग्णालयात पोहोचविण्यासाठी नागरिकांची धावपळ होत आहे. त्यातच शासकीय मुख्यालयातील डॉक्टर आणि कर्मचारी नियमित उपस्थित राहत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शासकीय आरोग्यसेवेची जबाबदारी असतानाही काही डॉक्टर स्वतःच्या खासगी दवाखान्यांना अधिक प्राधान्य देत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या संपूर्ण प्रकाराची वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून चौकशी करावी, अशी मागणी होत आहे. वानोळा परिसर हा आदिवासी, बंजारा आणि दुर्गम वस्तीचा भाग आहे. येथील नागरिकांसाठी शासकीय आरोग्य केंद्र आणि १०२ रुग्णवाहिका या अत्यंत महत्त्वाच्या सुविधा आहेत. मात्र, रुग्णवाहिका बंद असल्याने गंभीर रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहोचविण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ---- ((कोट)) वानोळा परिसरातील १०२ रुग्णवाहिका बंद असणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका उपलब्ध नसेल, तर सर्वसामान्य नागरिकांनी उपचारासाठी कुठे जायचे? संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकाराची तातडीने चौकशी करून रुग्णवाहिका सुरू करावी आणि दोषींवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. -नितीन राठोड. रुग्ण, पाचुंदा, ता.माहूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mixed Gender Cricket Tournament : क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच! मुलं आणि मुली खेळणार एकाच टीममधून; 'हा' नवा विचित्र नियम पाहून चक्रावून जाल!

Pune Bengaluru Highway: पुणे-बंगळूर महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा! किनीतील आंदोलनामुळे कोगनोळीत ट्रकच्या लांबच लांब रांगा

Agniveers Extension: अग्निवीरांना दोन वर्षांची मुदतवाढ! कायम लष्करी सेवेत सामील होण्याची पुन्हा संधी मिळणार

IND vs NZ: 'चेस मास्टर' विराटचा वाढदिवसाआधीच धुमाकूळ! सचिन - पाँटिंगला मागे टाकत रचले तीन वर्ल्ड रेकॉर्ड

Mangalwedha Farmers: दिवाळीपूर्वी मंगळवेढ्यातील ६९ हजार शेतकऱ्यांना दिलासा; खात्यावर ३४ कोटी ६३ लाख जमा, ८ हजार अजून प्रतीक्षेत!

SCROLL FOR NEXT