छत्रपती संभाजीनगर

‘वरवरचे वधू-वर’ने प्रेक्षकांना हसवले, अंतर्मुखही केले

CD
ABD26J82068 (((ओव्हरसेट))) ((((फोटो ओळ))) उस्मानपुरा ः नाट्यप्रयोगाच्या सुरवातीला उपस्थित डॉ. चिन्मय बाऱ्हाळे, रमेश राजपूत, सुव्रत जोशी, सखी गोखले, सूरज पारसनीस. --- ‘वरवरचे वधू-वर’ने प्रेक्षकांना हसवले, अंतर्मुखही केले --- ‘सकाळ’ नाट्यमहोत्सवात खट्याळ, मार्मिक भाष्य आणि बहारदार सादरीकरण .... उस्मानपुरा, ता. २५ ः घरच्यांचा लग्नासाठीचा आग्रह, करिअरची धावपळ, जोडीदाराकडून असलेल्या अपेक्षा आणि प्रेमाऐवजी व्यावहारिक गरजेतून लग्नाचा करार करण्याचा निर्णय होतो. आजच्या तरुणाईच्या आयुष्यातील या गुंतागुंतीच्या गोष्टींना विनोदाची फोडणी देत ‘वरवरचे वधू-वर’ या नाटकाने प्रेक्षकांना खळखळून हसवले. मात्र, हास्याच्या या प्रवासात लग्नसंस्था, नात्यांमधील अपेक्षा आणि बदलती मानसिकता यावर विचार करायलाही भाग पाडले. ‘सकाळ’ नाट्यमहोत्सवानिमित्त शनिवारी (ता. २४) संत एकनाथ रंगमंदिरात सादर झालेल्या या नाटकाला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. नाटकाची गोष्ट आहे मोहित माने (सुव्रत जोशी) आणि विशाखा माने (सखी गोखले) या दोन समकालीन तरुणांची. कॉर्पोरेट जगतात कामाच्या व्यापात अडकलेल्या या दोघांनाही घरच्यांच्या लग्नाच्या आग्रहाला सामोरे जावे लागते. लेखक-दिग्दर्शक विराजस कुलकर्णी यांनी आजच्या पिढीची मानसिकता, लग्नाविषयीचे बदलते विचार, करिअरची धावपळ आणि सोशल मीडियाचा प्रभाव यांची संहितेत सुरेख गुंफण केली आहे. नाटकाचे नाव ‘वरवरचे’ असले, तरी त्यातील प्रसंग नात्यांच्या खोलवर जाणाऱ्या भावविश्वाचा वेध घेतात. सूरज पारसनीस यांनीही आपल्या भूमिकेतून विनोदाची रंगत वाढवली. अपर्णा अध्यापक यांनी सूत्रसंचालन केले. --- मान्यवरांचा सत्कार ‘सकाळ’ नाट्यमहोत्सव एक्सेल सोलार पॉवर प्रस्तुत असून, शांती नर्सिंग होमचे को-स्पॉन्सर्स म्हणून विशेष सहकार्य लाभले. यावेळी ‘सकाळ’च्या मराठवाडा आवृत्तीचे युनिट हेड संजय चिकटे यांनी सखी गोखले, सुव्रत जोशी, सूरज पारसनीस, रमेश राजपूत आणि डॉ. चिन्मय बाऱ्हाळे यांचा सत्कार केला. ...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मल्लिकार्जुन खरगेंच्या 'त्या' विधानावरून वाद पेटला! अमित शहांसह भाजपचे नेते आक्रमक; म्हणाले...

Pune News: माळेगावात वनपाल सहा हजारांची लाच घेताना रंगेहाथ; शेतातील माती वाहतुकीत अडथळा न आणण्यासाठी मागितले पैसे

MI NEXT CAPTAIN: मुंबई इंडियन्सचा पुढचा कर्णधार कोण? माजी खेळाडूने सांगून टाकलं नाव; रोहित शर्मा अन् हार्दिक पांड्याबद्दल मोठं वक्तव्य!

IND W vs ZIM W: हरमनप्रीत-दीप्तीने रचला शतकांचा डाव! भारताने झिम्बाब्वेसमोर ठेवलं मोठं लक्ष्य, दुसऱ्या डावात थरार सुरू

Mohol Crime New: मोहोळमध्ये ८५ वर्षीय वृद्धेला गंडा; दूध देण्याचे आमिष दाखवून ५० हजारांचे सोन्याचे दागिने लंपास

SCROLL FOR NEXT