छत्रपती संभाजीनगर

भाजीपाल्याच्या बाजारात खरेदीचा उत्साह मंदावला

CD
भाजीपाल्याच्या भावात चढ-उतार --- कांदा, लिंबू, अद्रक, लसणाची आवक कमी; टोमॅटो, भेंडी, वांगी मुबलक --- सकाळ वृत्तसेवा जाधववाडी, ता. २० : भाजीपाला बाजारात सध्या आवक मुबलक आहे. मात्र, सणासुदीचे दिवस असल्याने विक्री काहीशी घटल्याचे निरीक्षण व्यापाऱ्यांनी नोंदवले आहे. बाजारपेठेत मंदीचे वातावरण असल्याने भाजीपाला विक्रीवरही त्याचा परिणाम झाला आहे. दरम्यान, काही भाज्यांच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. टोमॅटोचा भाव प्रतिकिलो ३० रुपयांवरून ४० रुपये झाला आहे, तर वांग्याचा भाव ५० रुपयांवरून ४० रुपयांपर्यंत खाली आला. भेंडीचे भाव ६० रुपयांवरून ४० रुपयांवर, तर काकडीचे भाव ५० रुपयांवरून ४० रुपयांवर आले आहेत. दुसरीकडे, अद्रकाचा भाव २०० रुपयांवरून २४० रुपये, तर कंटुल्याचा भाव २०० रुपयांवरून २४० रुपये प्रतिकिलोवर पोचला आहे. लिंबाचे भाव सर्वाधिक २४० रुपये प्रतिकिलो असून, लसूण दर्जानुसार २५० ते ४०० रुपयांपर्यंत विकला जात आहे. शेवग्याचा भाव १०० रुपये प्रतिकिलो आहे. बटाटे २५ ते ३० रुपये, कांदा ७० रुपये, भोपळा ४० रुपये, गाजर ६० रुपये, कारले ६० रुपये आणि कोबी ६० रुपये किलो आहे. याशिवाय वाल व गिलके ८० रुपये, हिरवी मिरची व सिमला मिरची ६० रुपये, दिलपसंद ८० रुपये, दोडके ६० रुपये, तर श्रावण घेवडा ६० रुपये प्रतिकिलोने मिळत आहे. --- दुष्काळाचा बाजारावर परिणाम दुष्काळामुळे ग्रामीण भागातील ग्राहकांच्या खर्चावर मर्यादा आल्या असून, बाजारातील एकूण उलाढालीवरही त्याचा परिणाम होत आहे. भाजीपाल्याची आवक पुरेशी असली तरी ग्राहकांकडून खरेदीचे प्रमाण कमी असल्याने व्यापाऱ्यांमध्ये मंदीचे वातावरण आहे. काही भाज्यांचे भाव कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला असला, तरी कांदा, लिंबू, लसूण व अद्रकाची आवक घटल्याने त्यांचे भाव चढेच आहेत. ---- भाजीपाल्याचे आजचे भाव (प्रतिकिलो) बटाटे ः २५ ते ३० रुपये कांदा ः ७० रुपये भोपळा ः ४० रुपये काकडी ः ४० रुपये टोमॅटो ः ३० ते ४० रुपये वांगे ः ४० रुपये भेंडी ः ४० रुपये गाजर ः ६० रुपये कारले ः ६० रुपये कोबी ः ६० रुपये वाल - ः ८० रुपये गिलके ः ८० रुपये हिरवी मिरची ः ६० रुपये सिमला मिरची ः ६० रुपये दिलपसंद ः ८० रुपये लिंबू ः२४० रुपये दोडके ः ६० रुपये शेवगा ः १०० रुपये अद्रक ः २४० रुपये लसूण ः २५० ते ४०० रुपये श्रावण घेवडा (बिन्स) ः ६० रुपये कंटुले ः २४० रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Martyr Wife Success Story: १८ वर्षांपूर्वी पती गमावला; आज त्याच वर्दीत देशसेवेची जबाबदारी, वीरपत्‍नी कल्पना पवारांचा संघर्षमय अन् प्रेरणादायी प्रवास..

India Pakistan Passports : अंबरनाथमध्ये एकाच व्यक्तीकडे भारत-पाकिस्तानचे पासपोर्ट; मुंबई ATS कडूनही चौकशी सुरू

Sonam Maskar Silver Medal : मुलीच्या रायफलसाठी वडिलांनी विकली जमीन; कोल्हापूरच्या सोनम मस्करचे आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक

Marathi News Live Updates : भुसावळ शहरात कुजलेल्या अवस्थेत आढळला मानवी मृतदेह

Satara Crime: जमिनीचा वाद पेटला अन्‌ भावकीतील युवकावर दांडक्याने हल्ला; उपचार सुरू असतानाच मृत्यू

SCROLL FOR NEXT