sambhaji nagar  sakal
छत्रपती संभाजीनगर

Verul Ajanta Mahotsav 2024 : संभाजीनगरात आजपासून वेरूळ-अजिंठा महोत्सव

जिल्ह्याच्या पर्यटन वृद्धीला प्रोत्साहन देणारा आणि शहराचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारा वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव शुक्रवारपासून सुरू होत आहे. पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत सोनेरी महल येथे सायंकाळी ६.३० वाजता उद्‍घाटन होईल, अशी माहिती संयोजन समितीने दिली.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्याच्या पर्यटन वृद्धीला प्रोत्साहन देणारा आणि शहराचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारा वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव शुक्रवारपासून सुरू होत आहे. पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत सोनेरी महल येथे सायंकाळी ६.३० वाजता उद्‍घाटन होईल, अशी माहिती संयोजन समितीने दिली.

पालकमंत्री संदीपान भुमरे, मंत्री अतुल सावे, मंत्री अब्दुल सत्तार, आमदार संजय शिरसाट, खासदार इम्तियाज जलील, लोकसेवा हक्क आयोगाचे राज्य आयुक्त दिलीप शिंदे, मनपा प्रशासक जी. श्रीकांत, पोलिस आयुक्त मनोज लोहिया, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, राज्य पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक अमोल गोटे, पर्यटन सदिच्छा दूत नवेली देशमुख आदींची उपस्थिती राहणार आहे.

विविध सांस्कृतिक कार्यक्रम

उद्‍घाटनानंतर प्रसिद्ध नृत्यांगना डॉ. संध्या पुरेचा १६ कलाकारांच्या चमूसह भरतनाट्यम सादर करतील. त्यानंतर पंडिता अनुराधा पाल यांच्या स्त्री शक्ती इन्स्ट्रुमेंट्स फ्युजनच्या टीमसह स्त्री शक्तीवर आधारित पाच वाद्यांचे सादरीकरण करतील. तसेच राहुल देशपांडे आणि प्रियांका बर्वे हे दोन्ही प्रसिद्ध शास्त्रीय व उपशास्त्रीय गायक अभंग आणि मराठी गीत सादर करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : आजोबा भाजी विकायचे, वडील शिवणकाम करतात... लव्हप्रीतने भारतासाठी जिंकले ऐतिहासिक पदक!

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

SCROLL FOR NEXT