छत्रपती संभाजीनगर

मध्यरात्रीच्या धावपळीत वाचले गायीचे प्राण

CD
पशुवैद्यकीय चमूने वाचवला गायीचा जीव -------------- परभणी पशुवैद्यकीय महाविद्यालयात शस्त्रक्रिया यशस्वी सकाळ वृत्तसेवा परभणी, ता.५ ः प्रसूतीच्या वेदनांनी व्याकूळ गाय, जीवघेणी गुंतागुंत आणि रात्रीची वेळ अशा कठीण परिस्थितीत पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या चमूने दाखविलेली तत्परता एका मुक्या जीवासाठी जीवनदान देणारी ठरली. शुक्रवारी (ता.दोन) गांधी जयंतीची सुटी असूनही पशुवैद्यकीय तज्ज्ञांनी मध्यरात्री रुग्णालयात धाव घेत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी करून गायी जीव वाचविला. विशेष म्हणजे, या शस्त्रक्रियेनंतर गाईने एका वासराला जन्म दिला. त्यामुळे उपचारस्थळी उपस्थित सर्वांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले. वांगी (ता.मानवत) येथील शताक्षी गोशाळेतील गायीस शुक्रवारी दुपारपासून प्रसूतीवेदना सुरू होत्या. बराच वेळ उलटूनही प्रसूती होत नसल्याने परिस्थिती गंभीर बनली. स्थानिक पातळीवर उपचार करणे शक्य नसल्याने डॉ. चौधरी यांनी गोसेवक शिवदास पोतलवाड, अंकुश सरोदे, मुंजाजी पोतलवाड आणि अंकुश कदम यांच्या मदतीने गायीस तातडीने वाहनातून परभणी येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयात आणले. महात्मा गांधी जयंतीनिमित्त महाविद्यालयाला सुटी होती. मात्र गाईची गंभीर अवस्था लक्षात येताच पशुवैद्यकीय तज्ज्ञांनी क्षणाचाही विलंब न करता रुग्णालयात धाव घेतली. पशु प्रजनन व प्रसूतीशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. मंजुषा पाटील, पशुऔषधी वैद्यकशास्त्राचे सहायक प्राध्यापक डॉ. पंकज हासे, पदव्युत्तर अभ्यासक्रमातील विद्यार्थी तत्काळ उपचारासाठी दाखल झाले. गाईचा गाभण काळ पूर्ण झाला मात्र नैसर्गिक प्रसूती होण्याची शक्यता दिसत नव्हती. वारंवार येणाऱ्या तीव्र प्रसुती कळांमुळे गायीच्या जीवास धोका निर्माण झाला. वेळ न दवडता पशुवैद्यकीय तज्ज्ञांनी शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सुरू करण्यात आलेली ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया शुक्रवारी रात्री ११ वाजेपर्यंत सुरू होती. डॉक्टर आणि विद्यार्थ्यांची संपूर्ण टीम अथक प्रयत्न करत होती. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि सुरक्षितपणे वासराला बाहेर काढण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर गाईने वासराला जन्म दिल्याचे समजताच उपचारस्थळी उपस्थित सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. काही वेळापूर्वी जीवासाठी संघर्ष करणारी गाय, तिचे नवजात वासरू सुखरूप असल्याचे पाहून गोसेवकांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला. --- विद्यार्थ्यांचाही मोलाचा सहभाग या यशस्वी उपचारप्रक्रियेत पशु प्रजनन व प्रसूतीशास्त्र विभागातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी डॉ. गुरुनाथ बेरूले, डॉ. सुरज अंभुरे, डॉ. यश गायकवाड, डॉ. गौरव सूर्यवंशी, डॉ. सुरज व्हनमाने तसेच पदवी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी रमाकांत कागेरू, केदार नूच्चे, अर्जुन घोळवे, बसवेश्वर हेन्ते, रवी माळी आणि संभाजी डाके यांनी सहभाग घेतला. विभागप्रमुख डॉ. मंजुषा पाटील, सहायक प्रा. डॉ. पंकज हासे यांच्या नेतृत्वाखाली ही उपचारप्रक्रिया पार पडली. ----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nobel Prize 2026: वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कारांची घोषणा! 'या' तीन दिग्गज व्यक्तींच्या नावांचा समावेश

निरागस वासू साकारला, आता नजर खलनायकाच्या भूमिकेवर; राज कुंदन म्हणतो, “मला पुढे मांजरेकर सरांसोबत...”

Mohan Joshi : मोहन जोशी हे महाराष्ट्राचा अभिमान ;उद्योगमंत्री उदय सामंत : संगीतसूर्य केशवराव भोसले पुरस्काराने सन्मान

भाजपने राज्यसभेच्या ८ उमेदवारांची केली घोषणा, केंद्रीय मंत्र्यांसह दिग्गजांचा पत्ता कट; योगींच्या मंत्र्याची वर्णी

Latest Marathi News Live Update : शिक्षक भरतीत लाखोंची फसवणूक, अपूर्व हिरेंसह पाच जणांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT