छत्रपती संभाजीनगर

सात महिन्यांच्या थकीत मानधनासाठी ग्रामरोजगार सहाय्यक आक्रमक

CD
ग्रामरोजगार सहाय्यकांचे उपोषण बीड, ता. १६ (बातमीदार) : गेल्या सात महिन्यांपासून प्रलंबित असलेले मानधन तातडीने मिळावे आणि त्याचा एफ.टी.ओ. त्वरित काढावा, या प्रमुख मागणीसाठी गेवराई तालुक्यातील ग्रामरोजगार सहाय्यक आक्रमक झाले आहेत. प्रशासनाच्या उदासीनतेच्या निषेधार्थ ग्रामरोजगार सहाय्यक संघटनेच्या वतीने सोमवारी (ता. १६) बीड जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले आहे. मानधनाअभावी कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात गेल्याने त्यांच्यामध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. गेवराई पंचायत समिती अंतर्गत एकूण १२७ ग्रामरोजगार सहाय्यक कार्यरत आहेत. त्यांचे २०२४-२५ या आर्थिक वर्षातील सहा महिने आणि मार्च २०२६ चा एक महिना, असे एकूण सात महिन्यांचे मानधन अद्याप थकीत आहे. थकीत मानधनाचा ''एफ.टी.ओ.'' काढण्याबाबत संबंधित गटविकास अधिकारी आणि नरेगा विभागाला वारंवार लेखी व तोंडी निवेदने देऊनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. वेळेवर मानधन न मिळाल्याने ऐन दिवाळीत या कर्मचाऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले. अखेर नाइलाजाने आंदोलनाचे हत्यार उपसत कर्मचाऱ्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या प्रश्नात तातडीने लक्ष घालून न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे. या आंदोलनात संघटनेचे गेवराई तालुकाध्यक्ष तुकाराम गवारे, उपाध्यक्ष महादेव कादे, सचिव रमेश जाधव यांच्यासह बहुसंख्य ग्रामरोजगार सहाय्यक सहभागी झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज ठाकरेंची मोठी खेळी! बड्या नेत्यांसह ३५० कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश, एकनाथ शिंदेंसह छावा संघटनेला धक्का

Kulgam Encounter: कुलगाम हल्ल्याचा बदला! लष्कर-ए-तैयबाचा टॉप कमांडर लतीफ भटसह दोन दहशतवादी ठार; जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षादलांची मोठी कारवाई

IND vs NZ: मैदानावर अनेक खेळाडू होते, पण तिरंग्यासाठी धावला फक्त सिराज! video पाहून तुम्हीही कराल कौतुक

Latest Marathi News Update : पिंपरी-चिंचवधील मोरे पाटील चौकात अपघात, वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा जागीच मृत्यू

Latur District Bank: निलंगेकर विरुद्ध निलंगेकर! काकींचा पराभव करत अरविंद पाटलांची जिल्हा बँकेत दमदार एन्ट्री; भाजपचा तिन्ही जागांवर विजय

SCROLL FOR NEXT