छत्रपती संभाजीनगर

सात ग्रामपंचायतींच्या विकासकामांची चौकशी करा

CD
सात ग्रामपंचायतींच्या विकासकामांची चौकशी करा --- खासदार आष्टीकर ः मंजूर निधीच्या विनियोगाची तपासणी होणार ---- सारखणी, ता.१ (बातमीदार) : ग्रामपंचायतींच्या कामकाजात पारदर्शकता राहावी आणि विकासकामांसाठी मंजूर निधीचा योग्य विनियोग व्हावा, यासाठी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी माहूर तालुक्यातील सात ग्रामपंचायतींमधील विविध विकासकामांची सखोल चौकशी करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. याप्रकरणी त्यांचे सहकारी गौरव राठोड प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा करत आहेत. गोंडवडसा, अंजनखेड, सेलू करंजी, शेकापूर, सिंदखेड, पारडी आणि हारडफ या ग्रामपंचायतींचा चौकशीसाठी समावेश करण्यात आला आहे. गेल्या पाच वर्षांत पंधरावा वित्त आयोग, जल जीवन मिशन, मनरेगा आणि जिल्हा नियोजन व विकास समितीच्या जनसुविधा योजनांतर्गत मंजूर निधीच्या विनियोगाची तपासणी करण्याची मागणी केली आहे. यासाठी ई-ग्रामस्वराज पोर्टलवरील आर्थिक नोंदी, कामांचे जिओ-टॅगिंग, मोजमाप पुस्तिका (एमबी रेकॉर्ड) आणि प्रत्यक्ष कामांची स्थिती यांची पडताळणी करण्यावर भर देण्यात आला आहे. अनेक गावांत रस्ते, सांडपाणी व्यवस्था, पिण्याचे पाणी आणि पथदिव्यांबाबत ग्रामस्थांच्या तक्रारी असल्याचे नमूद केले आहे. मंजूर निधीतून प्रत्यक्ष किती कामे पूर्ण झाली, याची स्थळपाहणी करून वस्तुनिष्ठ चौकशी करावी. अनियमितता किंवा निधीचा अपव्यय आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी खासदार आष्टीकर यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा रक्तरंजित संघर्ष! दोन गटांत भीषण गोळीबार; पाच जणांचा मृत्यू, तणाव वाढणार?

IND vs NZ: ईशान किशनने सूर्यकुमारला टाकलं मागे अन् असा पराक्रम करणारा बनला पहिलाच भारतीय

Drought Crisis: टंचाईच्या स्थितीतून बळीराजाला सावरण्याचा प्रयत्न ;शरद पवार यांचा दौरा सुरु

Latest Marathi News Update : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माढा तालुक्यात केली नुकसानग्रस्त पिकांची पाहणी, शेतकऱ्यांशी साधला संवाद

IND vs NZ ODI: टी-२० मालिकेनंतर टीम इंडिया पुन्हा सज्ज! पहिला वनडे सामना कधी, कुठे अन् किती वाजता? लाईव्ह सामना टीव्ही मोबाईलवर कुठे पाहता येणार?

SCROLL FOR NEXT