sambhaji nagar  sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar : वन विभागाच्या कार्यालयावर ग्रामस्थांचा हल्लाबोल ; कन्नडच्या उंबरखेडा येथे पाइपलाइन रोखल्यामुळे संताप

उंबरखेडा येथील योजनेची पाइपलाइन रोखून सामान जप्त केल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी हिवरखेडा (गौताळा) येथील वन्यजीव विभागाच्या कार्यालयावर बुधवारी दुपारी हल्ला केला. यावेळी धक्काबुक्की झाल्याने अत्यवस्थ झाल्याने वनपालाला छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

कन्नड : उंबरखेडा येथील योजनेची पाइपलाइन रोखून सामान जप्त केल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी हिवरखेडा (गौताळा) येथील वन्यजीव विभागाच्या कार्यालयावर बुधवारी दुपारी हल्ला केला. यावेळी धक्काबुक्की झाल्याने अत्यवस्थ झाल्याने वनपालाला छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पी.एम. बर्डे असे या वनपालाचे नाव आहे. सरपंच रूमदेव चव्हाण यांनी सांगितले की, उंबरखेडा गावात तीव्र पाणी टंचाई असून सध्या वीस दिवसाआड पाणी पुरवठा होतो. जनजीवन मिशन अंतर्गत एक कोटी तेरा लाख ब्याऐंशी हजार रुपये निधी मंजूर झाला. गावापासून सहा किलोमीटर अंतरावरील धरणात विहीर खोदून पाइप लाईन करण्यात येत आहे. वन्यजीव विभागाने या कामात सातत्याने अडथळा आणला.

विहिरीलाही परवानगी देण्यास विलंब केला. विहीर केली. आता वन्यजीव विभागाने पाइप लाईन करण्यास विरोध केला. आम्ही पाइपलाइन खासगी शेतकऱ्यांच्या शेतातून करत आहोत. तरीही कर्मचाऱ्यांनी पाइपलाइनचे साहित्य, जनरेटर, पाइप जप्त केले. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी वन्यजीव विभागाच्या कार्यालयावर हल्लाबोल केला. वनपाल बर्डे यांनी सांगितले की, वन अधिनियमनुसार वनविभागाच्या हद्दीत खोदकाम करता येत नाही. तसेच जप्त केलेले साहित्य परत करण्याचा अधिकार मला नाही.

अन् ग्रामस्थांचा संताप अनावर झाला

बुधवारी हिवरखेडा गौताळा येथील वन्यजीव विभागाच्या कार्यालयावर उंबरखेडा ग्रामस्थांनी महिलांसह हल्ला बोल केला. महिलांसह ग्रामस्थांनी वनपाल बर्डे यांना जाब विचारून धक्काबुक्की केली. संतप्त ग्रामस्थांनी कार्यालयाच्या खिडक्या, टेबलवर आदळ आपट करून घोषणाबाजी केली. यावेळी मोहन मांगू पवार, पद्माबाई राठोड, पार्वती राठोड, राहुल राठोड, प्रवीण चव्हाण, ईश्वर चव्हाण, विलास राठोड, नीलाबाई पवार, विकास पवार, मूलचंद चव्हाण आदींसह दोनशेहून अधिक ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवले ब्रिजवरील वाहतूक ३ तासांनी सुरू; कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर, आंदोलकांमध्ये तीव्र नाराजी

Mumbai Indians Playoff Scenario: मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टात? आता काही केलं तरी प्ले ऑफमध्ये पोहोचणे अशक्य; हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर सवाल, CSK चं काय?

How Mumbai Indians Still Qualify for Playoff? हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघ नेमका कुठे कुठे चुकला? मुंबई इंडियन्सला १४ गुणांसह अव्वल चार मध्ये पोहोचता येईल का?

Dhamangaon Blaze: नागपूरमधील धामणगाव विद्यामंदिर गावात भीषण आग, ३०-४० घरे जळून खाक, लाखोंचे नुकसान

गोव्यात दारू प्यायल्यावर जास्त नशा का चढत नाही? ९९ टक्के लोकांना खरं कारण माहित नाही...

SCROLL FOR NEXT