छत्रपती संभाजीनगर

विष्णुपुरीचे पाणी पिण्यासाठीच; रब्बी सिंचनाला ‘नो एन्ट्री’

CD
लीड ‘विष्णुपुरी’चा साठा केवळ पिण्यासाठीच कालव्याच्या पाण्याच्या भरवशावर पेरणी न करण्याचे जलसंपदा विभागाचे आवाहन सकाळ वृत्तसेवा नांदेड, ता. ३० : अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती आणि पाणीसाठ्याची मर्यादा लक्षात घेता, शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठा केवळ पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्यात आला आहे. त्यामुळे सन २०२६-२७ या वर्षात विष्णुपुरीच्या कालव्याद्वारे रब्बी हंगामासाठी सिंचनाचे पाणी सोडले जाणार नाही. परिणामी, लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना रब्बी पिकांसाठी कालव्याच्या पाण्यावर अवलंबून राहता येणार नाही. शेतकऱ्यांनी या बाबीचे गांभीर्य लक्षात घेऊन पाण्याच्या भरवशावर पेरणी अथवा लागवड करू नये, असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने ५ ऑक्टोबर २०२६ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार विष्णुपुरी प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठा ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित ठेवण्यात आला आहे. नांदेड महानगरपालिका तसेच ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांची गरज लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनीही या प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवले आहे. सिंचनासाठी पाणी सोडणे अशक्य पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित असल्याने चालू वर्षी रब्बी हंगामात कालव्याद्वारे सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देणे शक्य होणार नाही. त्यामुळे विष्णुपुरी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी कालव्याला पाणी येईल, या अपेक्षेने रब्बी पिकांची पेरणी, लागवड किंवा अन्य पीक उत्पादनाचे नियोजन करू नये. अशा अपेक्षेने पेरणी अथवा लागवड केल्यानंतर पाण्याअभावी नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी जलसंपदा विभागाची राहणार नाही, असेही विभागाने स्पष्ट केले आहे. ---- पाण्याचे नियोजन करण्याचे आव्हान दुष्काळसदृश परिस्थितीत उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करणे आणि शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध करून देणे हे प्रशासनासमोरील मोठे आव्हान आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पर्यायी जलस्रोत आणि उपलब्ध पाण्याचा विचार करूनच रब्बी हंगामाचे नियोजन करावे. - सी. आर. बनसोड, कार्यकारी अभियंता, नांदेड पाटबंधारे विभाग (उत्तर) -----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचं मोठं पाऊल! मुदत संपलेल्या अन्नपदार्थांच्या पुनर्विक्रीबाबत नवे नियम लागू

BJP PM Candidate Announcement for 2029 : २०२९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा PM पदाचा चेहरा ठरला! बैठकीत अमित शाहांनी अचानक जाहीर केलं 'हे' नाव; राजकीय वर्तुळात मोठी खळबळ!

China EV Crisis: चिनी इलेक्ट्रिक कारचा जगात डंका, पण मायदेशात ठणठणाट! चीनच्या ईव्ही उद्योगाचं गणित कसं बिघडलं?

IND vs NZ, 4th T20I: टीम इंडियाचं नेमकं काय चुकलं? कर्णधार श्रेयस अय्यरने स्पष्टच सांगिलतं; फिलिप्सचंही केलं भरभरून कौतुक

Marathi News Live Updates : सोलापूर जिल्हा बँकेत भाजपचे दोन उमेदवार बिनविरोध

SCROLL FOR NEXT